पंचाळा येथे महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST2021-02-05T04:39:26+5:302021-02-05T04:39:26+5:30

रामटेक : युवा विज्ञान कृषी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने पंचाळा (बु) (ता. रामटेक) येथे नुकतेच महिला मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले ...

Women's meet at Panchala | पंचाळा येथे महिला मेळावा

पंचाळा येथे महिला मेळावा

रामटेक : युवा विज्ञान कृषी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने पंचाळा (बु) (ता. रामटेक) येथे नुकतेच महिला मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात महिलांंना शेती व आराेग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

आराेग्य विभागाच्या सीएमओ पूजा भाेयर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी युवा विज्ञान कृषी बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष रविभूषण दुधपचारे हाेते तर प्रमुख पाहुणे म्हणून मालिनी शिंगारे, राजिना राठाेड, अर्चना भांडारकर, चेतना बागडे, दिलीप भांडारकर, शारदा माेहनकार व याेगेश मात्रे उपस्थित हाेते. यावेळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाला अश्विन भांडारकर, कृष्णा भांडारकर, नीता भांडारकर, रामप्रसाद कामठे, गजानन दळवी, अमाेल घाेडमारे यांच्यासह स्थानिक महिला व नागरिक उपस्थित हाेते. संस्थेचे सचिव याेगेश माेहनकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

Web Title: Women's meet at Panchala