लिहिगाव येथे महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:08+5:302021-01-17T04:09:08+5:30
कामठी : लिहिगाव (ता. कामठी) येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात महिलांना ...

लिहिगाव येथे महिला मेळावा
कामठी : लिहिगाव (ता. कामठी) येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सरपंच गणेश झाेड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून समाजकार्य करावे, असे आवाहन गणेश झाेड यांनी उद्घाटनपर भाषणात केले. उपसरपंच सुनीता ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र निकाळजे, सुनीता बोरकर, सुषमा ठाकरे, सुनीता सोनटक्के, ग्रामविकास अधिकारी श्याम उचेकर यांनीही मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतच्यावतीने महिलांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शांताराम ठाकरे, रवींद्र गेचुडे, दिनेश ठाकरे, पंकज बोरकर, राजू काकडे, सतीश ठाकरे, रोहन हिवसे, रत्नाकर झोड, स्वप्निल मेश्राम यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित हाेत्या.