शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी देशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:21 IST

एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवरस्वार होऊन. बुधवारी ती नागपुरात आली असता ‘जनआक्रोश’च्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भारतात दर दिवसाला विना हेल्मेट चालविणाऱ्या सुमारे ९८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. ही संख्या हेल्मेटचे महत्त्व सांगणारे आहे, म्हणून याची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पूजाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देपूजा यादव हिचे ‘मिशन हेल्मेट’ : जनआक्रोशतर्फे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवरस्वार होऊन. बुधवारी ती नागपुरात आली असता ‘जनआक्रोश’च्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भारतात दर दिवसाला विना हेल्मेट चालविणाऱ्या सुमारे ९८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. ही संख्या हेल्मेटचे महत्त्व सांगणारे आहे, म्हणून याची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पूजाचे म्हणणे आहे.पूजा हिला लहानपणापासूनच ‘बाईक’चे वेड होते. काही वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर वाचले असते. या घटनेने मैत्रिणीचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले. तेव्हापासून हेल्मेटविषयी जनजागृती करण्याची पूजाची इच्छा होती. पतीकडून मिळालेले प्रोत्साहन व एका ‘एनजीओ’च्या मदतीने महिलांमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी २० नोव्हेंबरपासून तिने ‘मिशन हेल्मेट’ हाती घेतले. नोएडा येथून हे ‘मिशन’ सुरू झाले.‘लोकमत’शी बोलतान पूजा म्हणाली, बाईक चालविण्याची प्रेरणा पतीपासून मिळाली. पूर्वी बाईकने लांबचा प्रवास करण्यास भीती वाटायची. परंतु आता अनुभव गाठीशी आहे. आतापर्यंत ५० हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. या ‘मिशन’मध्ये महामार्गाने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना थांबवून त्यांना हेल्मेटविषयी माहिती देते. अपघात कुणाला सांगून येत नाही, यामुळे तुमची काळजी तुम्हीच घेण्याचे आवाहन करते. मैत्रिणीचे कुटुंब एका चुकीने कसे रस्त्यावर आले, त्याची माहिती देते. पोलिसांच्या भीतीने नव्हे तर स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घाला. हेल्मेट उच्च दर्जाचेच वापरा, अशीही पूजा म्हणाली. नागपूरमध्ये एक दिवसाचा मुक्काम करून गुरुवारी हैदराबादसाठी रवाना होणार आहे. येथून ती विजयवाडा, विशाखापट्टणम्, भुवनेश्वर, कोलकाता, लखनौला जाईल; नंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शहरांना भेट देऊन दिल्ली येथे समारोप होईल.बुधवारी सकाळी पूजाचे नागपुरात आगमन होताच जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांनी सत्कार केला. यावेळी सचिव रवींद्र कासखेडीकर, डॉ. सुनीती देव, दिलीप मुक्केवार, प्रमेश शहारे, अशोक करंदीकर, कृष्णकुमार वर्मा, डॉ. प्रवीण लाड व जनआक्रोशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.विना हेल्मेट ३५ हजार ९७५ दुचाकीस्वारांचा मृत्यू२०१७ मध्ये देशात रस्ता अपघातात हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्या ३५ हजार ९७५ चालकांचा मृत्यू झाला, तर ३६ हजार ६७८ दुचाकीस्वार जखमी झाले. विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या २८ हजार ८९६ चालकांचा मृत्यू तर ३३ हजार २६४ जखमी झाले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या तीन हजार १७२ चालकांचा मृत्यू तर तीन हजार ६६८ चालक जखमी झाले.

टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी