महिलांचे आराेग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:02+5:302021-03-13T04:14:02+5:30
खापा : नजीकच्या गुमगाव माॅयल येथे महिलांच्या आराेग्य तपासणी शिबिराचे माॅयलच्या विश्रामगृहात आयाेजन करण्यात आले. यावेळी महिलांना आराेग्याविषयक मार्गदर्शन ...

महिलांचे आराेग्य तपासणी शिबिर
खापा : नजीकच्या गुमगाव माॅयल येथे महिलांच्या आराेग्य तपासणी शिबिराचे माॅयलच्या विश्रामगृहात आयाेजन करण्यात आले. यावेळी महिलांना आराेग्याविषयक मार्गदर्शन करीत याेग्य काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
माॅयलचे खाण प्रबंधक आर.ए. खान यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माॅयल महिला मंडळाच्या अध्यक्ष रफत खान, माॅयलचे अधिकारी जे.पी. सिंह, एस.डी. लोहकरे, नितीन परारडकर, मनोज मोंढे, ललित अरसडे, देवेंद्र बोडखे, रियाज कुरेशी, सुनील रामपती, अनूप सोना उपस्थित हाेते. डॉ. आलिया क्षीरसागर, डॉ. शुभांगी सोलखे, अश्विनी क्षीरसागर, सुंदरबाई रगडे, निरवज परवीन, गंगा जमनादास, माया श्रावण, माधुरी गडीकर, डॉ. अश्विनी क्षीरसागर व डॉ. राहुल क्षीरसागर यांनी महिलांच्या आराेग्याची तपासणी करीत सेवा प्रदान केली. यावेळी माॅयलच्या महिला कर्मचाऱ्यांसह इतर माहिलांची आराेग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आकांक्षा शाहू यांनी केले.