रोकडे ज्वेलर्समध्ये महिला दिन, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:31+5:302021-03-13T04:14:31+5:30
महिला दिनाच्या निमित्ताने रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मीनगर, महाल, इतवारी व एअरपोर्ट या चारही शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. या पर्वावर ...

रोकडे ज्वेलर्समध्ये महिला दिन, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
महिला दिनाच्या निमित्ताने रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मीनगर, महाल, इतवारी व एअरपोर्ट या चारही शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. या पर्वावर ग्राहकांसाठी सुवर्ण, चांदी, प्लॅटिनम व डायमण्ड ज्वेलरीच्या घडणावळीवर १० टक्के सवलत प्रदान करण्यात आली. स्त्री ही आई आहे, बहीण आहे, पत्नी व मैत्रीणही आहे. ती आपल्या स्पर्शाने प्रत्येकाचे आयुष्य उजळून टाकते आणि परिपूर्णता प्रदान करते. म्हणूनच प्रत्येक कर्तृत्ववान स्त्री ही जगासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे आणि याच भावनेतून रोकडे ज्वेलर्सतर्फे महिलांना मानाचा मुजरा केला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी खास सवलत प्रदान केली जाते. त्याच अनुषंगाने महिलांनी रोकडेंच्या चारही दालनात गर्दी केली आणि सोने असो वा चांदी, प्लॅटिनम, डायमण्ड किंवा नवग्रह रत्नजडित दागिने असो, सर्व प्रकारच्या वैविध्यपूर्ण अशा आभूषणांची खरेदी करताना या पर्वावर महिला दिसून आल्या. यावेळी स्टाफ मेम्बर्सनीही त्यांचे हसतमुख स्वागत केले. ग्राहकांच्या या अखंड प्रेमामुळेच रोकडे ज्वेलर्सला ‘नागपूरकरांचा दागिना’ हे बिरुद प्राप्त झाले आहे. आणि याच कारणाने दागिने निर्मिती क्षेत्रात एक मोठा व विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून रोकडे ज्वेलर्स नावरूपास आले आहे.
...................