शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day 2019; ‘चॅलेंज’ स्वीकारा, यश मिळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:39 IST

महिलांनी स्वत:मधील सुप्तगुणांना वाव मिळवून द्यावा, आपले छंद जोपासावेत. हे छंद आपल्याला आनंद देतात, असे मत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देउपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहाकणखर राहून निर्णयक्षमता सिद्ध करा

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महिलांना एकाचवेळी विविध भूमिका निभावाव्या लागतात. चॅलेंज आणि कर्तव्य म्हणून ते निभावण्याचा प्रयत्न आपण करतोय. नोकरी करीत असताना एक सपोर्ट सिस्टीम मिळाली तर महिला या अधिक चांगले काम करू शकतात. महिलांनी कणखर राहून आपली निर्णयक्षमता सिद्ध करावी.एकाच वेळी विविध कामे करण्याची कला महिलांमध्ये असते. महिलांनी विशेषत: नोकरीपेशा महिलांनी घर आणि नोकरी सांभाळत असतानाच स्वत:कडेही लक्ष देण्याची गरज आहे. महिलांनी स्वत:मधील सुप्तगुणांना वाव मिळवून द्यावा, आपले छंद जोपासावेत. हे छंद आपल्याला आनंद देतात, असे मत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले.राजलक्ष्मी शहा या मूळच्या कराड जि. सातारा येथील. वडील प्रोफेसर होते. घरचे वातावरण अतिशय चांगले होते. राजलक्ष्मी या अभ्यासात हुशार होत्या. दहावीला त्या पुणे विद्यापीठात मेरिटमध्ये आल्या होत्या. सातारा जिल्ह्यातून त्या पहिल्या होत्या. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच पाहिले होते. त्यामुळेच दहावीत मेरिट येऊनही त्यांनी आर्टस्मध्ये प्रवेश घेतला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश लिटरेचरमधून एम.ए. केले. त्यानंतर त्यांनी एमपीएससीची तयारी केली. १९९९ ला त्या सिलेक्ट झाल्या. उपजिल्हाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती त्यांची नागपूरला झाली. नागपूर, वर्धा येथे काम करीत त्यांची पुन्हा नागपूरला बदली झाली. सध्या त्या नागपूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. लवकरच निवडणुका होत आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून त्यांचे काम अधिकच वाढले आहे.माझ्या जडणघडणीत माझ्या माहेरच्या मंडळींचा जितका रोल आहे, तितकाच माझ्या सासरच्या मंडळींचासुद्धा असल्याचे मोठ्या अभिमानाने राजलक्ष्मी शहा सांगतात.शहा यांना पुस्तक वाचायची आवड आहे. मोटिव्हेशनल बुकपासून ते सर्वच प्रकारचे साहित्य त्यांना आवडते. त्या कामाने कितीही थकल्या तरी एखाद्या पुस्तकाची काही पाने वाचल्याशिवाय त्यांना झोप येत नसल्याचे त्या आवर्जून सांगतात. शास्त्रीय संगीत आणि नृत्याचीही त्यांना आवड आहे. छंद हे जोपासायला हवेत, ते आनंद देतात. असे त्यांचे मानणे आहे. म्हणूनच त्यांनी इतर महिलांना आणि विशेषत: नोकरीपेशा महिलांनी स्वत:कडेही आवर्जून लक्ष द्यावे, स्वत:चा छंद जोपासावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन