नोटाबंदी विरोधात महिला काँग्रेसचा थाळीनाद
By Admin | Updated: January 8, 2017 02:18 IST2017-01-08T02:18:50+5:302017-01-08T02:18:50+5:30
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल. सर्वसामान्यांना याचा फायदा होईल,

नोटाबंदी विरोधात महिला काँग्रेसचा थाळीनाद
नागपूर : नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल. सर्वसामान्यांना याचा फायदा होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के ला होता. परंतु ५० दिवसानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
यामुळे कष्टकरी महिला, मजूर, शेतकरी, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे. ही गंभीर परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी. यासाठी शहर महिला काँग्रेसच्यावतीने शनिवारी बडकस चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्या नेतृत्वात थाळीनाद करून नोटबंदीच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. थाळीनादामुळे बडकस चौकाचा परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात तक्षशिला वागधरे, कांता पराते, संगीता उपरीकर, सरिता राणेकर, अंजना मडावी, सुनीता जिचकार, ललिता शाहू, रजनी बरडे, रजनी राऊ त, रेखा बुराडकर, बेबी गौरीकर, पुनम खाडे, पुष्पा सोनावणे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
नोटबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मोदी सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रज्ञा बडवाईक यांनी या प्रसंगी दिला.(प्रतिनिधी)