लाचखोरीकडे महिलांचीही पावलं!

By Admin | Updated: May 29, 2014 03:19 IST2014-05-29T03:19:29+5:302014-05-29T03:19:29+5:30

कर्तृत्वाचा ठसा उमटवून अनेक क्षेत्रात पुरुषांशी बरोबरी करणार्‍या महिलांची पावलं आता लाचखोरीतही पडू लागली आहे.

Women's bribery! | लाचखोरीकडे महिलांचीही पावलं!

लाचखोरीकडे महिलांचीही पावलं!

नागपूर : कर्तृत्वाचा ठसा उमटवून अनेक क्षेत्रात पुरुषांशी बरोबरी करणार्‍या महिलांची पावलं आता लाचखोरीतही पडू लागली आहे. गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत पूर्व विदर्भातील सात महिलांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यावरून हे स्पष्ट झाले आहे.

प्रत्येकच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत आहेत. अनेक क्षेत्रात तर पुरुषांना स्तंभित करणारी कामगिरी महिला बजावत आहेत. त्यांचे कर्तृत्व प्रशंसेचा विषय ठरले असतानाच महिलांनी आता लाचखोरीतही पावलं ठेवल्यामुळे नकळतच समाजाच्या भुवया उंचावल्या आहेत. १२ मार्च ते २८ मे २0१४ या कालावधीत पूर्व विदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५0 लाचखोरांना अटक केली. त्यामध्ये सात महिलांचाही समावेश आहे. यातील एक महिला बालविकास अधिकारी, दुसरी शाळा सचिव, दोन परिरक्षण भूमापक, दोन तलाठी आणि एक सरपंच आहे. पकडल्या गेलेल्या या महिलांपैकी कुणी पाचशे रुपयांच्या हव्यासापोटी आपले पद आणि प्रतिष्ठा डावावर लावली. तर, कुणी दोन लाखांसाठी ! लाच घेताना सापडलेल्या महिलांची नावे, पद, गाव आणि त्यांनी मागितलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे.

Web Title: Women's bribery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.