महिला विकतात खेळणी, पुरुष टाकतात दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:10 IST2021-08-19T04:10:48+5:302021-08-19T04:10:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फूटपाथवर डेरा टाकून राहणाऱ्या महिला या दिवसा खेळणी विकतात तर पुरुष मंडळी रात्री दरोडा ...

Women sell toys, men rob | महिला विकतात खेळणी, पुरुष टाकतात दरोडा

महिला विकतात खेळणी, पुरुष टाकतात दरोडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फूटपाथवर डेरा टाकून राहणाऱ्या महिला या दिवसा खेळणी विकतात तर पुरुष मंडळी रात्री दरोडा टाकत असल्याची बाब उघडकीस आली आहे. येथील युवकांना जरीपटका पोलिसांनी दरोडा टाकण्याची तयारीत असताना रंगेहात पकडले. पाच आरोपीला अटक केली. अरुण बबलू मोंग्या (१९), रोमियया दिधर मोंग्या (२१), अरुण प्रकाश सोलंकी (२५), बूच्चा पापडिंगा मोंग्या (१९) आणि मुकंदर अर्जुन पारधी (३५), अशी आरोपीची नावे आहेत. आरोपी हे वेगवेगळ्या शहरात राहतात. काही दिवसापासून ते कस्तुरचंद पार्कवरील फूटपाथवर कुटुंबासह राहतात. त्यांनी तात्पुरत्या झोपड्याही बनविल्या आहेत. आरोपी दिवसभर आराम करतात, तर महिला व मुले एलआयसी चौकात खेळणी आणि फुगे विकतात.

बुधवारी मध्यरात्री ३.२५ वाजता जरीपटक्याचे पीआय नितीन फटांगडे हे सहकाऱ्यांसह भीम चौक परिसरात गस्त घालत होते. पोलिसांना पाहून झुडपात लपलेले आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. एका फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या त्यांच्या दोन साथीदारांनाही पकडण्यात आले. त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू

सापडल्या. विचारपूस केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. परिसरात ते मोठा दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचा पोलिसांना संशय आहे. शहरात अलीकडे चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सर्वांच्या हातातवर एक विशेष चित्र कोरलेले आहे. ही त्यांची विशेष ओळख असल्याची शक्यता आहे. आरोपी हे एका मोठ्या टोळीशी संबंधित असल्याची शंकाही पोलिसांना आहे. लहान-मोठ्या चोरी करीत असल्याचे या आरोपींनी कबूल केले. आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Women sell toys, men rob