बचत गटाच्या महिलांनी केले वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST2021-08-25T04:12:54+5:302021-08-25T04:12:54+5:30

कामठी : महिला बचत गटाच्या वतीने न्यू येरखेडा (ता. कामठी) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अतिथींसह महिला ...

The women of the self-help group also planted trees | बचत गटाच्या महिलांनी केले वृक्षाराेपण

बचत गटाच्या महिलांनी केले वृक्षाराेपण

कामठी : महिला बचत गटाच्या वतीने न्यू येरखेडा (ता. कामठी) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अतिथींसह महिला बचत गटाच्या सदस्यांनी गावातील माेकळ्या जागेवर वृक्षाराेपण केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येकाने एक राेपटे लावून त्याचे याेग्य संगाेपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मंगला कारेमोरे, माजी उपसरपंच मनीष कारेमोरे, सुषमा राखडे, वंदना वाडीभस्मे, सरिता भोयर, मनीषा बडवाईक, प्रीती देशमुख, हेमकांता काळे, सुनीता आगाशे, सुषमा तलमले, जयश्री अनासाने, पुष्पा महल्ले, नेहा महल्ले, वंदना भस्मे, कविता बावनकर उपस्थित होत्या. या सर्वांनी न्यू येरखेडा येथील रामकृष्ण ले-आऊटमध्ये विविध जातीच्या ५१ राेपट्यांची लागवड केली. संचालन व आभारप्रदर्शन सुदाम राखडे यांनी केले.

Web Title: The women of the self-help group also planted trees