ग्रामीण भागातील महिलांनी स्वंयरोजगाराचा संकल्प करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:44+5:302021-07-31T04:09:44+5:30
कामठी : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयं रोजगार उभारून आत्मनिर्भर होण्याचे ...

ग्रामीण भागातील महिलांनी स्वंयरोजगाराचा संकल्प करावा
कामठी : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयं रोजगार उभारून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन येरखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला कारेमोरे यांनी केले. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित महिला बचत गटाच्या मार्गदर्शक कारमोरे यांनी महिलांशी संवाद साधला.
दुर्गा महिला बचत गट, सर्वेधनी महिला बचत गट, प्रियाशु महिला बचत गटाच्या सदस्यांसह सुषमा राखडे, सविता खोकरे, सरिता भोयर, कविता बावनकर, वंदना भस्मे, पिंकी खोब्रागडे, दीपा सोनटक्के, वनिता नाटकर, जया वाडीभस्मे, ग्रामपंचायत सदस्य राजश्री धीवरे, पूर्णिमा बरवे ,मंगला पाचे, दुर्गा रडके,उषा कारेमोरे, प्राजक्ता ढोले, मुक्ता कारेमोरे, शोभा कारेमोरे, रजनी कारेमोरे,अनसूया खरवडे, प्रतिभा गेडाम ,आचल तिरपुडे, अलका वजारी आदी याप्रसंगी उपस्थित होत्या. प्रास्ताविक रंजना राजश्री धीवले यांनी केले. संचालन डॉ. प्राजक्ता ढोले तर सुषमा राखडे यांनी मानले.