महिलांचा दारूविक्रेत्यांना चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:43+5:302021-01-08T04:22:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : तालुक्यात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढत असतानाच याला आळा घालण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाेलिसांनी ...

महिलांचा दारूविक्रेत्यांना चाप
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्यात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढत असतानाच याला आळा घालण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाेलिसांनी वाकेशवर येथे महिलांच्या मदतीने, तर जवळी येथे स्वतंत्र कारवाई करीत एकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला. यात एकास अटक केली. या दाेन्ही कारवाई रविवारी (दि. ३) करण्यात आल्या.
मिलिंद देविदास वाकडे, रा. वाकेश्वर, ता. भिवापूर हा वाकेश्वर शिवारात दारू विकत असल्याची माहिती स्थानिक महिलांनी रविवारी सकाळी पाेलिसांना दिली. त्यामुळे पाेलिसांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठले. मात्र, पाेलीस येत असल्याची कुणकुण लागल्याने त्याने दारूच्या बाटल्या साेडून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी घटनास्थळाहून देशीदारूच्या २६ बाटल्या जप्त केल्या. त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पाेलिसांनी व्यक्त केला. या कारवाईमध्ये वाकेश्वर येथील सरपंच शारदा माेटघरे, छाया कांबळे, बयाबाई पाटील, चंदा गावंडे, अल्का वराडे, पुष्पा चौधरी, रुखमा वानखेडे, फुलकन्या गजभिये, संजय गावंडे, बाबा मानकर, गुंडेराव फलके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी जवळी (ता. भिवापूर) येथे धाड टाकली. यात त्यांनी अवैध दारूविक्रेता नरेंद्र मेश्राम, रा. जवळी यास अटक केली आणि त्याच्याकडून देशीदारूच्या १८ बाटल्या जप्त केल्या. या दाेन्ही कारवाईमध्ये एकूण चार हजार रुपयांची दारू जप्त केल्याची माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.