शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

महिलांनाही थेट नगराध्यक्षांचा मान

By admin | Updated: September 4, 2016 03:06 IST

जनतेद्वारे थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया यावर्षी पुन्हा एकदा राबविली जाणार आहे.

उमरेडमध्ये दोनदा संधी : खापा, मोहपा, कामठीचेही केले प्रतिनिधित्वगणेश खवसे नागपूरजनतेद्वारे थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया यावर्षी पुन्हा एकदा राबविली जाणार आहे. त्यासाठी जोरदार रस्सीखेच असून इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत अशाप्रकारे झालेल्या निवडणुकीकडे लक्ष दिल्यास मतदारांनी महिलांनाही नगराध्यक्षपदी संधी दिली. आतापर्यंत पाच महिला या थेट नगराध्यक्ष झाल्या असून २००२ मध्ये एकाचवेळी चार महिला नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या, हे विशेष!नागपूर जिल्ह्यातील कामठी, उमरेड, काटोल, सावनेर, मोहपा, रामटेक, नरखेड, खापा, कळमेश्वर आणि मोवाड या दहा नगर परिषदांमध्ये थेट जनतेला नगराध्यक्ष निवडण्याची प्रकिया राबविण्यात आली. केवळ अलीकडे स्थापन झालेल्या वाडी आणि कन्हान नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया झालेली नाही. १९७४ मध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया पार पडली. तो मान नरखेड नगर परिषदेला जात असून काँग्रेसचे रमेश गुप्ता हे जनतेचे पहिले नगराध्यक्ष झाले. जिल्ह्यात १९७४ नंतर १९७८, २००२, २००५ मध्ये अशा प्रकारची सार्वत्रिक तर २००३ आणि २००६ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या सहा निवडणुकांपैकी २००२ मध्ये पहिल्यांदा महिलांनाही थेट नगराध्यक्ष होण्याची किमया साधता आली. त्यानंतर २००३ मध्ये पोटनिवडणुकीतही थेट नगराध्यक्षपदी महिला निवडण्यात आली. २००२ मध्ये कामठीतून माया चवरे, उमरेडमधून रुखमा सोरते, मोहप्यात आशा यावलकर आणि खाप्यात माया कोहाड यांची जनतेने नगराध्यक्षपदी निवड केली. २००३ मध्ये उमरेडमध्ये पोटनिवडणूक होऊन अलका भिवापूरकर या नगराध्यक्ष झाल्या. विशेष बाब म्हणजे, केवळ उमरेड नगर परिषदेतच दोन महिलांना थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. इतर नगर परिषदांपैकी कामठी, मोहपा, खापा येथे केवळ एकदाच महिलांना संधी मिळाली. काटोल, सावनेर, रामटेक, नरखेड, कळमेश्वर, मोवाड येथे जनतेद्वारे महिलेला थेट नगराध्यक्ष होता आले नाही. काटोल, सावनेर, रामटेक येथे अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया केवळ एकदाच राबविल्याची बाब पुढे करता येऊ शकते. मात्र नरखेड, मोवाड आणि कळमेश्वरने ही संधी गमावली. निवडणूक होणाऱ्या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झालेले नसलेले तरीही यावेळी किमान ही कमतरता भरून निघण्याची चिन्हे आहे.