महिलांनाही थेट नगराध्यक्षांचा मान

By Admin | Updated: September 4, 2016 03:06 IST2016-09-04T03:06:42+5:302016-09-04T03:06:42+5:30

जनतेद्वारे थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया यावर्षी पुन्हा एकदा राबविली जाणार आहे.

Women are also directly conferred the head of the municipality | महिलांनाही थेट नगराध्यक्षांचा मान

महिलांनाही थेट नगराध्यक्षांचा मान

उमरेडमध्ये दोनदा संधी : खापा, मोहपा, कामठीचेही केले प्रतिनिधित्व
गणेश खवसे नागपूर
जनतेद्वारे थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया यावर्षी पुन्हा एकदा राबविली जाणार आहे. त्यासाठी जोरदार रस्सीखेच असून इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत अशाप्रकारे झालेल्या निवडणुकीकडे लक्ष दिल्यास मतदारांनी महिलांनाही नगराध्यक्षपदी संधी दिली. आतापर्यंत पाच महिला या थेट नगराध्यक्ष झाल्या असून २००२ मध्ये एकाचवेळी चार महिला नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या, हे विशेष!
नागपूर जिल्ह्यातील कामठी, उमरेड, काटोल, सावनेर, मोहपा, रामटेक, नरखेड, खापा, कळमेश्वर आणि मोवाड या दहा नगर परिषदांमध्ये थेट जनतेला नगराध्यक्ष निवडण्याची प्रकिया राबविण्यात आली. केवळ अलीकडे स्थापन झालेल्या वाडी आणि कन्हान नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया झालेली नाही. १९७४ मध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया पार पडली. तो मान नरखेड नगर परिषदेला जात असून काँग्रेसचे रमेश गुप्ता हे जनतेचे पहिले नगराध्यक्ष झाले.
जिल्ह्यात १९७४ नंतर १९७८, २००२, २००५ मध्ये अशा प्रकारची सार्वत्रिक तर २००३ आणि २००६ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या सहा निवडणुकांपैकी २००२ मध्ये पहिल्यांदा महिलांनाही थेट नगराध्यक्ष होण्याची किमया साधता आली. त्यानंतर २००३ मध्ये पोटनिवडणुकीतही थेट नगराध्यक्षपदी महिला निवडण्यात आली. २००२ मध्ये कामठीतून माया चवरे, उमरेडमधून रुखमा सोरते, मोहप्यात आशा यावलकर आणि खाप्यात माया कोहाड यांची जनतेने नगराध्यक्षपदी निवड केली. २००३ मध्ये उमरेडमध्ये पोटनिवडणूक होऊन अलका भिवापूरकर या नगराध्यक्ष झाल्या. विशेष बाब म्हणजे, केवळ उमरेड नगर परिषदेतच दोन महिलांना थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. इतर नगर परिषदांपैकी कामठी, मोहपा, खापा येथे केवळ एकदाच महिलांना संधी मिळाली. काटोल, सावनेर, रामटेक, नरखेड, कळमेश्वर, मोवाड येथे जनतेद्वारे महिलेला थेट नगराध्यक्ष होता आले नाही. काटोल, सावनेर, रामटेक येथे अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया केवळ एकदाच राबविल्याची बाब पुढे करता येऊ शकते. मात्र नरखेड, मोवाड आणि कळमेश्वरने ही संधी गमावली. निवडणूक होणाऱ्या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झालेले नसलेले तरीही यावेळी किमान ही कमतरता भरून निघण्याची चिन्हे आहे.

Web Title: Women are also directly conferred the head of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.