महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:08 IST2021-04-21T04:08:41+5:302021-04-21T04:08:41+5:30

जलालखेडा : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील थडीपवनी-खेडी (खुर्द) पांदण रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना साेमवारी (दि.१९) सायंकाळी ...

The woman's body was found | महिलेचा मृतदेह आढळला

महिलेचा मृतदेह आढळला

जलालखेडा : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील थडीपवनी-खेडी (खुर्द) पांदण रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना साेमवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

नानुबाई रामकृष्ण ठाकरे (६५, रा. वंडली वघाळ, ता. वरुड, जि. अमरावती) असे मृत महिलेचे नाव आहे. नानुबाई ही गतिमंद असून, दोन-तीन दिवसापासून घरून निघून गेली हाेती. तिच्या बेपत्ता असण्याबाबत कुटुंबीयांनी बेनाेडा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली हाेती. दरम्यान, साेमवारी सायंकाळच्या सुमारास थडीपवनी-खेडी (खुर्द) पांदण रस्त्यावर ती मृतावस्थेत आढळून आली. तिला अन्न व पाणी न मिळाल्याने तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी हर्षवर्धन गंगाधरराव इंगाेले (३५, रा. वडाळा, ता. वरुड, जि. अमरावती) यांच्या तक्रारीवरून जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास नाईक पाेलीस माेरेश्वर चलपे करीत आहेत.

Web Title: The woman's body was found