शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

स्त्रित्वानेच माझे नुकसान केले : उषा खन्ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 22:19 IST

५५ वर्षांच्या सांगितिक प्रवासात हे स्टारडम मला टिकवता आले नाही याचे एकमेव कारण मी स्त्री असणे हेच आहे, अशा शब्दात प्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी आयुष्याच्या या वळणावर हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट सांगितली.

ठळक मुद्देलोकमत भेटीत सांगितली हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जद्दनबाई आणि सरस्वती देवीच्या परंपरेतील मी पुढची कडी असले तरी माझा काळ आणि संगीत दोन्ही वेगळे होते. नौशादजी, शंकर जयकिशन, मदन मोहन या संगीतकारांचा सुवर्णकाळ ऐनभरात असताना मी संगीतबद्ध केलेला ‘दिल दे के देखो’ आला आणि मी रातोरात स्टार झाले. पण, ५५ वर्षांच्या सांगितिक प्रवासात हे स्टारडम मला टिकवता आले नाही याचे एकमेव कारण मी स्त्री असणे हेच आहे, अशा शब्दात प्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी आयुष्याच्या या वळणावर हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट सांगितली. ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ या कार्यक्रमासाठी नागपूरला आल्या असता त्यांनी लोकमतला भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्या पुढे म्हणाल्या, संगीत माझ्या रक्तातच होते. वडिलांचा समृद्ध संगीतीय वारसाही लाभला होता. म्हणून मी पुरुषी साम्राज्य असलेल्या या क्षेत्रात येण्याचे धाडस केले. प्रारंभी चांगले यशही मिळाले. परंतु पुढे निर्माता-दिग्दर्शक मला काम द्यायला घाबरायला लागले. कारण, स्त्री म्हणून माझ्यावर खूप मर्यादा होत्या आणि त्याकाळी या मर्यादा पाळून पुढे जाणे शक्य नव्हते. परिणामी बॉक्स आॅफिसच्या दृष्टीने माझे चित्रपट ‘बी ग्रेड’च राहिले. पण, मी मात्र नेहमीच माझ्यातील ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच छोडो कल की बाते.... शायद मेरी शादी का खयाल...मधूबन खुशबू देता हैं...चाँद को क्या मालूम...या सारखी अजरामर गीते मी चित्रपटसृष्टीला देऊ शकले, याकडेही उषा खन्ना यांनी लक्ष वेधले.अतिरेकी संगीतात कवित्व हरवलेआजचे कुठलेही गाणे ऐका. त्यात कान फाडणारे संगीत असते. परंतु थेट हृदयाला जाऊन भिडतील असे शब्द कुठेच दिसत नाहीत. म्हणूनच अशी गाणी दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहत नाहीत. आता तर रियॅलिटी शोे ही गायक घडविणारी फॅक्टरी झाली आहे. ज्याचा आवाज नाही, रियाजची तयारी नाही तोही गायक बनतोय. बादशाह, हनिसिंग गातात की किंचाळतात कळत नाही, इतकी चित्रपट संगीताची अवस्था वाईट झाली आहे.आता कुणी ओळखत नाहीमाझे केवळ असणेही एका काळात मैफिलीच्या ‘रौनक’चा विषय होता. आता कोण उषा खन्ना असा प्रश्न लोकांना पडतो. मी अजूनही काम करतेय, संगीत देतेय पण ओळख मात्र हरवली आहे. पण, मला त्याची खंत नाही. पंकज उधास, सोनू निगम, शब्बीर कुमार, विनोद राठोड या नवोदित गायकांना मी मंच उपलब्ध करून दिला. आज त्यांना गाताना बघून जे समाधान लाभते ते शब्दातीत आहे.‘जिंदगी प्यार का गीत हैं’उषा खन्ना यांचे संगीतबद्ध केलेले गीत व त्यांच्याशी मुक्त संवाद असे स्वरूप असलेला ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ हा कार्यक्रम बुधवार ७ मार्च रोजी सायंकाळी ६.४५ वाजता पंडित वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या या कार्यक्रमाच्या नि:शुल्क पासेस संपल्या असून कार्यक्रमस्थळी मात्र दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत तिकीट विक्री सुरू राहणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक