शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात गेलेल्या महिलेची आज होणार नागपुरात चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:24 IST

Nagpur : पाकिस्तान भेटीचे कारण शोधणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारगिलमधील हुंदरमन गावाजवळ नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणारी सुनीता गटलेवार हिची गुरुवारी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूर पोलिसांचे पथक तिला नागपुरात घेऊन आले. मात्र, तिच्या मुलाची अद्याप कस्टडी न मिळाल्याने कुटुंबीयांना त्याचा ताबा मिळण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाकिस्तानातील एका धर्मगुरूला भेटण्यासाठी नागपुरातील ४३ वर्षीय महिला सुनीता ही कारगिलमधील नियंत्रण रेषा ओलांडून गेल्यामुळे खळबळ उडाली होती. पाकिस्तानी रेंजर्सने तिला पकडले व त्यानंतर तिला बीएसएफच्या हवाली केले. मागील काही काळापासून ती पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत चॅटिंग करत होती. ४ मे रोजी ती घरातून बेपत्ता झाली. तिची कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू होती. मुलगा कारगिल सीमेवरील हुंदरमन या गावात असल्याची माहिती तेथील पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविली. सुनीताचा मुलगा सध्या कारगिल बॉर्डर येथे चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या कस्टडीत आहे. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे त्यांनी तिची चौकशीदेखील केली. कपिलनगर पोलिस ठाण्यातील एक अधिकारी, दोन महिला कर्मचारी व आणखी एक कर्मचारी असे पथक अमृतसरला गेले होते. त्यांनी तिला ताब्यात घेतले व पथक नागपूरकडे निघाले. तिची गुरुवारी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अमृतसर पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवला आहे. तिचा कायमचा पत्ता नागपूरमध्ये असल्याने नागपूरमधील कपिलनगर पोलिस ठाण्यात तो हस्तांतरित केला जाईल. सुनीता परतली असली तरी तिचा १२ वर्षाचा बालमुलगाण सभिजूनही कारगिलमधील बालकल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) ताब्यात आहे. पोलिस या प्रकरणावर सक्रियपणे समन्वय साधत आहेत आणि तो पुढील काही दिवसांत परत येण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPakistanपाकिस्तान