महिला डॉक्टरची सोनसाखळी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST2021-09-18T04:09:15+5:302021-09-18T04:09:15+5:30
नागपूर : धंतोलीत पायी जात असलेल्या महिला डॉक्टरची सोनसाखळी पळवल्याची घटना घडली आहे. हिंगणा मार्गावरील रहिवासी डॉ. अपूर्वा सोपान ...

महिला डॉक्टरची सोनसाखळी पळविली
नागपूर : धंतोलीत पायी जात असलेल्या महिला डॉक्टरची सोनसाखळी पळवल्याची घटना घडली आहे. हिंगणा मार्गावरील रहिवासी डॉ. अपूर्वा सोपान गुप्ते गुरुवारी रात्री आपल्या मामाच्या घरी छत्रपतीनगरात जात होत्या. कल्पवृक्ष हॉस्पिटलजवळ मोपेडवर आलेल्या दोन युवकांनी अपूर्वा यांची ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. धंतोली पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
............
बंद घरातून दागिन्यांची चोरी
नागपूर : नंदनवनमध्ये बंद घरातून एक लाख रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. चिटणीसनगर येथील रहिवासी राजेश मोहर्ले गुरुवारी सकाळी कामावर गेले होते. त्यानंतर अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून एका लाखाचे दागिने चोरी केले. नंदनवन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
................
दारुड्या पतीने पत्नीला मारला चाकू
नागपूर : दारुड्या युवकाने पत्नीला चाकू मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र प्रसाद साहू (३०) रा. पवननगर, हुडकेश्वर याला दारुचे व्यसन आहे. साहु गुरुवारी रात्री नशा करून घरी आलाल. त्याने पत्नी कोमलशी वाद घातला. दरम्यान त्याने भाजी कापण्यासाठी असलेल्या चाकूने वार करून पत्नीला जखमी केले.
............