रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:26+5:302021-05-25T04:08:26+5:30
वेलतूर : तेंदूपत्ता ताेडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात महिला गंभीररित्या जखमी झाली. ही घटना वेलतूरनजीकच्या ...

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
वेलतूर : तेंदूपत्ता ताेडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात महिला गंभीररित्या जखमी झाली. ही घटना वेलतूरनजीकच्या रूयाड शिवारात साेमवारी (दि.२४) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
विशाखा पुरुषाेत्तम नाकाडे (४०, रा. रूयाड, ता. कुही) असे जखमी महिलेचे नाव आहे. सध्या ग्रामीण भागात तेंदूपत्ता ताेडणीचे काम सुरू आहे. रूयाड येथील महिला मजुरांसह विशाखा हीदेखील परिसरातील जंगल शिवारात तेंदूपत्ता ताेडण्यासाठी गेली हाेती. दरम्यान, तेंदूपत्ता ताेडताना अचानक रानडुकराने विशाखावर हल्ला केला. इतर मजुरांनी आरडाओरड केल्यामुळे रानडुक्कर पळून गेला. मात्र, या हल्ल्यात विशाखाला गंभीररित्या दुखापत झाली. लगेच तिला वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डाॅक्टरांनी तिला नागपूर मेडिकल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जखमी विशाखाला नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. क्षेत्र सहायक पवार यांनी घटनेचा पंचनामा केला असून, वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे.