महिलेची अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली
By Admin | Updated: June 16, 2016 03:22 IST2016-06-16T03:22:29+5:302016-06-16T03:22:29+5:30
एका विवाहितेला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार करून अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा

महिलेची अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली
आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
नागपूर : एका विवाहितेला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार करून अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अभिजित शेषराव हजारे (३०) असे आरोपीचे नाव असून, तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. प्रकरण असे की, ३१ डिसेंबर २०१४ रोजी पीडित महिला ही अभिजितच्या आईसोबत त्याच्या घरी बसलेली असताना अभिजित घरी आला होता. ताईने नवीन गाडी घेतली आहे, अशी बतावणी करून त्याने पीडित महिलेला पेढा दिला होता. त्यानंतर बाहेर जातो, असे सांगून अभिजित निघून गेला होता. पीडित महिलेने पेढा खाल्ला होता. त्यात गुंगीचे औषध होते. गुंगीतच ती कशीबशी घरी जाऊन बेशुद्ध होऊन पडली होती. अभिजितने पीडित महिलेचे घर गाठून तिला विवस्त्र केले होते. बलात्कार करून त्याने तिचे मोबाईलने अश्लील चित्रीकरण केले होते.
पुढे ही व्हिडिओ क्लिप तिच्या पतीला दाखविण्याची भीती दाखवून तो वारंवार शरीरसंबंध करीत होता. ब्लॅकमेल करून बहादुरा, नीलडोह या ठिकाणीही त्याने पीडित महिलेला नेऊन बलात्कार केला होता. हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने १६ मे २०१६ रोजी नोंदविलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७६, ५०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेच्या भीतीने आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताच त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जे.ए. शेख हे आहेत. (प्रतिनिधी )