महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST2021-09-18T04:10:15+5:302021-09-18T04:10:15+5:30

कन्हान : आराेपीने महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केला. ही घटना कन्हान येथे बुधवारी (दि.१५) उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून ...

Woman molested, charges filed | महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

कन्हान : आराेपीने महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केला. ही घटना कन्हान येथे बुधवारी (दि.१५) उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.

आराेपी पृथ्वीराज पुसाराम वाघमारे, रा. गणेशनगर, कन्हान याने ५१ वर्षीय महिलेस ‘तुझ्या नवऱ्याच्या बिमारीकरिता लावलेला पैसा मला परत द्या’ असे म्हणून पीडितेला मारहाण केली व तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. शिवाय आराेपीने पीडितेच्या मुलांनासुद्धा हातबुक्कीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (ए), ३५४ बी, २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Web Title: Woman molested, charges filed