महिलेचा विनयभंग, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST2020-12-16T04:27:22+5:302020-12-16T04:27:22+5:30
कुही : गाईला आणण्यासाठी गावाबाहेरील मैदानात गेलेल्या महिलेचा आराेपीने विनयभंग केला. शिवाय आराेपीने पीडितेला हातबुक्कीने मारहाणही केली. ही घटना ...

महिलेचा विनयभंग, आराेपीस अटक
कुही : गाईला आणण्यासाठी गावाबाहेरील मैदानात गेलेल्या महिलेचा आराेपीने विनयभंग केला. शिवाय आराेपीने पीडितेला हातबुक्कीने मारहाणही केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्यांतर्गतच्या डाेंगरगाव येथे घडली.सुधाकर ऊर्फ खट्या दादाजी चाैधरी (४२, रा. खेंडा, ता. कुही, हल्ली मु. डाेंगरगाव) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पीडित महिला ही गावाबाहेरील मैदानात बांधलेली गाय आणण्याकरिता गेली असता, आराेपीने पीडितेच्या मनात लज्जा निर्माण हाेईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. अशात पीडितीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, आराेपीने तिला मागून धक्का देत खाली पाडले व हाताबुक्कीने तिला मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी भादंवि कलम ३५४, ३२३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पाेलीस निरीक्षक मंडावले करीत आहेत.