वाहनाची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:21+5:302021-05-30T04:08:21+5:30
पारशिवनी : भरधाव अज्ञात वाहनाने माेटारसायकलला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ...

वाहनाची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू
पारशिवनी : भरधाव अज्ञात वाहनाने माेटारसायकलला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी (कला) शिवारात नुकतीच घडली.
बेबी शकुना रामसिंग वाघाडे (५०, रा. केकडई, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. ती तिच्या जावयासाेबत एमएच-४९/बीएफ-७२८० क्रमांकाच्या माेटारसायकलवर मागे बसून जात हाेती. दरम्यान, डुमरी (कला) शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. यात बेबी शकुना यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक पळनाटे करीत आहेत.