शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नागपुरात टिप्परच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:03 IST

भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अ‍ॅक्टिव्हा चालक युवती गंभीर जखमी झाली तर तिच्या आईचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

ठळक मुद्देपारडीत घडला अपघात : आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अ‍ॅक्टिव्हा चालक युवती गंभीर जखमी झाली तर तिच्या आईचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.करुणा ज्ञानेश्वर कांबळे (वय ४१) असे मृत महिलेचे नाव आहे तर जखमी युवतीचे नाव महिमा ज्ञानेश्वर कांबळे (वय १७) आहे. महिमा तिच्या आईला घेऊन गुरुवारी रात्री आजीच्या घरी जात होती. एचपी टाऊन जवळ टिप्पर चालक आरोपी मोहम्मद अली कलामउद्दीन अन्सारी याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून महिमाच्या दुचाकीला धडक दिली त्यामुळे करुणा यांचा मृत्यू झाला तर महिमा गंभीर जखमी झाली. मिळालेल्या तक्रारीवरुन पारडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली पुढील तपास सुरू आहे.जखमी तरुणाचा मृत्यूदुचाकी घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन पैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. शुभम बंडोजी गोंडुळे (वय २०) असे मृताचे नाव आहे. पारडी भरतवाडा येथे राहणारा शुभम आणि त्याचा मित्र योगेश बबनराव राऊत ( वय २८) हे दोघे दुचाकीने १२ जुलै च्या रात्री ८ च्या सुमारास बजाज नगर परिसरातून जात होते. शंकरनगर बस थांब्याजवळ शुभमने भरधाव दुचाकीचे करकचून ब्रेक मारल्याने दुचाकी खाली पडली. त्यामुळे शुभम गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी १६ जुलैच्या सकाळी शुभम गोंधळे याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून बजाजनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू