शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 21:17 IST

मायलेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरून पडून ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या आईचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. म्हाळगीनगर चौकात गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देट्रकचालकाला जमावाकडून बेदम चोप : ट्रकची तोडफोड, म्हाळगीनगर चौकात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायलेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरून पडून ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या आईचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. म्हाळगीनगर चौकात गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सुचिता उमेश कुऱ्हे (वय ४९, रा. घाटे ले-आऊट, हुडकेश्वर) असे मृत महिलेचे तर आचल (वय २६) कुऱ्हे असे तिच्या जखमी मुलीचे नाव आहे.

सुचिता कुऱ्हे आणि त्यांची मुलगी आचल या मायलेकी अ‍ॅक्टीव्हाने (एमएच ४९/ एजी ७१५७) गुरुवारी सकाळी महाल येथे खरेदीसाठी जात होत्या. आचल दुचाकी चालवित होती. हुडकेश्वरकडून म्हाळगीनगरकडे जात असताना गांधीबाग सहकारी बँकेसमोर भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून खाली पडून सुचिता या ट्रकच्या मागील चाकात आल्या. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला तर आचल जखमी झाली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रकवर दगडफेक करीत तोडफोड केली. ट्रकचालकाला ट्रकमधून खाली खेचून बेदम मारहाण केली. संतप्त नागरिकांनी ट्रकला पेटविण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघातामुळे या मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली. माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढून त्यांना शांत केले आणि जखमी अवस्थेतील ट्रकचालकाची जमावाच्या तावडीतून सुटका केली. नंतर हुडकेश्वर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून आरोपी ट्रकचालक प्रल्हाद परसराम सोनटक्के (वय ४८, रा. शामनगर) याला अटक केली.खराब रस्ता अन् ट्रकचालकाचा निष्काळजीपणाम्हाळगी नगर ते हुडकेश्वर या मार्गावर वाहनांची २४ तास वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची स्थिती फारच खराब आहे. जागोजागी खड्डे पडल्याने कसरत केल्यासारखे वाहन चालवावे लागते. नेहमीच छोटे मोठे अपघात घडतात. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे नेहमीच ट्रॅफिक जाम होतो. मात्र, संबंधित प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. त्याचमुळे काही बेपर्वा वृत्तीचे वाहनचालक निष्काळजीपणे वाहन चालवितात. आजही तसाच प्रकार घडल्याने हा भीषण अपघात झाला.मायेच्या छत्राला बहीण-भाऊ मुकलेमृत सुचिता यांना आचल आणि अमित ही दोन अपत्य आहे. आचल देना बँकेत आधार सेंटर चालविते तर अमित आई सुचिताच्या मदतीने घरीच अगरबत्ती तयार करून विकायचा. आचल आणि अमित वडिलांच्या मायेपासून कधीच पोरके झाले आता ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे मातृछत्रही हरपले. या अपघातामुळे बहीण-भावाला जबर मानसिक धक्का बसला आहे तर, परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू