दुचाकीच्या धडकेत महिला ठार, दुसरी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:07+5:302021-02-05T04:49:07+5:30
शुक्रवारी रात्री ११.१५ च्या सुमारास हिराबाई आणि गीताबाई काम आटोपून घराकडे परत जात होत्या. सोमनाथ शंकरलाल पुनयानी (वय ५०, ...

दुचाकीच्या धडकेत महिला ठार, दुसरी गंभीर
शुक्रवारी रात्री ११.१५ च्या सुमारास हिराबाई आणि गीताबाई काम आटोपून घराकडे परत जात होत्या. सोमनाथ शंकरलाल पुनयानी (वय ५०, रा. शास्त्रीनगर) नामक आरोपीने निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून या दोघींना मागून धडक मारली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी हिराबाईंना मृत घोषित केले. गीताबाईंवर उपचार सुरू आहेत. सूरज जयेंद्र इंदूरकर (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पुनियानीला अटक केली.
---
चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
नागपूर : संजयनगर, डिप्टी सिग्नल परिसरात राहणारे संतोष जनकराम शाहू (वय ४२) यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. कापसीतील नाका नंबर ५ जवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. मिळालेल्या सूचनेवरून पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----