अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST2020-11-22T09:29:26+5:302020-11-22T09:29:26+5:30
भवानीनगर पारडी येथील रहिवासी ठाणेश्वरी कवडूजी पारधी (वय ४५) या शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पारडीच्या मानकरवाडीतून पायी जात ...

अपघातात महिला ठार
भवानीनगर पारडी येथील रहिवासी ठाणेश्वरी कवडूजी पारधी (वय ४५) या शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पारडीच्या मानकरवाडीतून पायी जात होत्या.अचानक वेगात आलेल्या एमपी १३ - बीए २०५५ क्रमांकाच्या बोलेरो चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पारधी गंभीर जखमी झाल्या. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुभम कवडूजी पारधी (वय २३)यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---