महिलेचा हाेरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:51+5:302021-04-12T04:07:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : गाढ झाेपेत असल्याने झाेपडीला लागलेली आग महिलेच्या लक्षात आली नाही. या आगीतून सावरायला व ...

महिलेचा हाेरपळून मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : गाढ झाेपेत असल्याने झाेपडीला लागलेली आग महिलेच्या लक्षात आली नाही. या आगीतून सावरायला व झाेपडीबाहेर पडायला वेळ न मिळाल्याने त्या महिलेचा आत हाेरपळून मृत्यू झाला. ही घटना काेराडी (ता. कामठी) नजीकच्या लाेणखैरी येथे रविवारी (दि. ११) सकाळी घडली.
कौसल्या कोकडे (६५, रा. लाेणखैरी, ता. कामठी) असे मृत महिलेचे नाव आहे. ती लाेणखैरी येथील ग्रामपंचायत कार्यालयालगत झाेपडी बांधून एकटीच राहायची. ती झाेपडी गवताची हाेती. दरम्यान, ती रविवारी सकाळी गाढ झाेपेत असताना झाेपडीने पेट घेतला. गाढ झाेपेत असल्याने झाेपडीला लागलेली आग तिच्या लक्षात आली नाही. झाेपडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
सरपंच लीलाधर भोयर, उपसरपंच बोधिसत्व झोडापे यांच्यासह तरुणांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही आग नियंत्रणात येईपर्यंत तिला झाेपडीबाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिचा आत खाटेवर हाेरपळून मृत्यू झाला. यात तिच्या शरीराचा अक्षरश: काेळसा झाला हाेता. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.