ओखा-हावडा रेल्वेगाडीत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST2021-06-22T04:07:05+5:302021-06-22T04:07:05+5:30

नागपूर : ओखा-हावडा रेल्वेगाडीत प्रवासादरम्यान एका विवाहित महिलेचा मृत्यु झाल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनीता जामुदा ...

Woman dies in Okha-Howrah train | ओखा-हावडा रेल्वेगाडीत महिलेचा मृत्यू

ओखा-हावडा रेल्वेगाडीत महिलेचा मृत्यू

नागपूर : ओखा-हावडा रेल्वेगाडीत प्रवासादरम्यान एका विवाहित महिलेचा मृत्यु झाल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनीता जामुदा (१९, रा. बरकेला, पश्चिम सिंहभुम, झारखंड) असे या महिलेचे नाव आहे. ती आपल्या पतीसोबत रेल्वेगाडी क्रमांक ०२९०५ ओखा-हावडा विशेष रेल्वेगाडीच्या कोच डी-१ने राजकोट ते चक्रधरपूर असा प्रवास करीत होती. या महिलेचा गर्भपात झाला होता. त्यानंतर ते आपल्या गावाकडे परत जात होते. प्रवासात या महिलेची प्रकृती बिघडली. याची सूचना गाडीतील टीटीईला देण्यात आली. टीटीईने नागपूरच्या उपस्टेशन व्यवस्थापकांना कळविले. उपस्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासून या महिलेस मृत घोषित केले. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण गाडगे करीत आहेत.

..........

Web Title: Woman dies in Okha-Howrah train