शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नागपुरात टिप्परच्या धडकेत महिला ठार; पुतणी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:42 IST

भरधाव टिप्परने मागून जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसून असलेल्या एका महिलेचा करुण अंत झाला. तर, तिची पुतणी जखमी झाली.

ठळक मुद्देधंतोलीत अपघात, आरोपी वाहनचालक गजाआडनंदा यांच्या जाण्याने आनंदावर विरजण

आॅनलाईन लोकमतनागपूर : भरधाव टिप्परने मागून जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसून असलेल्या एका महिलेचा करुण अंत झाला. तर, तिची पुतणी जखमी झाली. नंदा मुरलीधर कुंभारे (वय ४६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या त्रिमूर्तीनगरात राहत होत्या.नंदा यांची पुतणी पूजा रविवारी नागपुरात आली होती. तिने मोठीआई नंदा यांना आपल्या अ‍ॅक्टीव्हावर बसवून रविवारी रात्री ७ च्या सुमारास सीताबर्डीत आणले. तेथून त्या दोघी पंचशील चौक मार्गे लोकमत चौकाकडे येत होत्या. या मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव टिप्पर (एमएच ३१/ सीक्यू ६९९०) चालकाने पूजा चालवित असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे मागे बसलेल्या नंदा कुंभारे खाली पडल्या. टिप्परचा समोरचा भाग डोक्याला लागल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने टिप्परचालक आरोपी नंदू चिवली गोयल (वय ३८, रा. पांढराबोडी) याच्याकडे धाव घेतली. त्याला बेदम चोप दिला. तणावामुळे वाहतूक ठप्प झाली. माहिती कळताच धंतोलीचे पोलीस उपनिरीक्षक ए. के. वडस्कर आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाच्या ताब्यातून आरोपी गोयलला ताब्यात घेतले. जमावाला पांगवल्यानंतर मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करण्यात आला. अपघातामुळे जबर मानसिक धक्का बसलेल्या पूजालाही मेडिकलमध्ये नेले. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी गोयलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.नंदा यांच्या जाण्याने आनंदावर विरजणपूजा नरेश कुंभारे रामटेकच्या जैन मंदीर मार्गावर राहते. तिचे लग्न २५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. लग्नाच्या खरेदीच्या निमित्ताने पूजा नागपुरात आली आणि आपल्या मोठ्या आईसोबत शॉपींगसाठी सीताबर्डीत आली होती. मात्र टिप्परच्या रुपात आलेल्या काळाने नंदा यांना हिरावून नेले आणि कुंभारे परिवारांच्या आनंदावर विरजण टाकले.

टॅग्स :Accidentअपघात