महिलेचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:54+5:302021-02-16T04:10:54+5:30

काटाेल : घरी दिवाबत्ती करताना आगपेटीची काडी साडीवर पडल्याने जळालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल शहरातील राठी ले-आऊट, ...

Woman burnt to death | महिलेचा जळून मृत्यू

महिलेचा जळून मृत्यू

काटाेल : घरी दिवाबत्ती करताना आगपेटीची काडी साडीवर पडल्याने जळालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल शहरातील राठी ले-आऊट, धंताेली येथे ३० जानेवारीला घडली.

वैशाली विनायक वाचासुंदर (७१, रा. प्लाॅट नं. ५१, राठी ले-आऊट, धंताेली, काटाेल) असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली वाचासुंदर या आपल्या राहत्या घरी दिवाबत्ती करीत असताना आगपेटीची काडी त्यांच्या अंगावर पडली. यात साडीने पेट घेतल्याने त्या ४० ते ४५ टक्के जळाल्या. लागलीच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक एस. बी. साेनाेने (पाेलीस ठाणे अंबाझरी, नागपूर) यांच्या तक्रारीवरून काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास नाईक पाेलीस संताेष आंधळे करीत आहेत.

Web Title: Woman burnt to death