शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संदीप मिश्रा व जयवंता भगत खून प्रकरण : आराेपी महिलेसह प्रियकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 12:19 IST

महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर : संदीप प्रसन्नकुमार मिश्रा, रा. खाेब्रागडे नगर, पंचशील नगर, नागपूर आणि जयवंता टीकाराम भगत (५०, रा. पूर्वाटाेला, ता. लांजी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) या दाेघांच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या ३६ तासात आराेपी महिलेस अटक केली. संदीपचा मृतदेह रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला शिवारात तर जयवंताचा मृतदेह करडी (मध्य प्रदेश) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील देवारा शिवारात आढळून आला हाेता.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये महेश भैयालाल नागपुरे (४१, रा. सिद्धीटाेला, ता. सालेकसा, जिल्हा गाेंदिया) याच्यासह एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणात दाेन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. आराेपी महिली ही ३२ वर्षाची असून, ती मरकाखानदा, ता. सालेकसा, जिल्हा गाेंदिया येथील रहिवासी असून, ती जयवंताच्या भावाची मुलगी म्हणजेच तिची भाची हाेय.

महादुला शिवारात मंगळवारी (दि. १८) अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ताे अब्दुल सलीम अब्दुल सत्तार यांच्या माहुली शिवारातील शेतात काम करणारा असल्याचे स्पष्ट हाेताच त्याची ओळख पटली. त्याच्यासाेबत राहणारी जयवंताही याच काळापासून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने संदीपच्या खुनासाेबतच जयवंताचाही शाेध सुरू केला. त्यातच करडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत तिचाही मृतदेह आढळून आल्याने हा दुहेरी हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले.

दाेन्ही आराेपी प्रियकर प्रेयसी असून, महेश दाेन अल्पवयीन मुलांना घेऊन त्याच्या सीजी-०४/केझेड-२७११ क्रमांकाच्या वाहनाने लांजीहून माहुलीला आला हाेता. त्या तिघांनी रविवारी (दि. १६) रात्री संदीप व जयवंंताला बेदम मारहाण केली. संदीपला वाहनात टाकून महादुला शिवारात नेले. तिथे कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला व मृतदेह राेडलगतच्या खड्ड्यात फेकून दिला. त्यानंतर त्याने जयवंताचा कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला आणि मृतदेह देवारा शिवारात फेकला. या प्रकरणात चाैघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना रामटेक पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. 

आराेपी महिला जयवंताकडे राहायची

आराेपी महिला विवाहित असून, ती सात महिन्यांपूर्वी पतीला साेडून तिचा प्रियकर महेश भैयालाल नागपुरे याच्यासाेबत पळून जयवंताकडे आली हाेती. तिच्यासाेबत तिची दाेन मुलेदेखील हाेती. जयवंता ही तिची आत्या हाेय. ती व महेश जयवंतासाेबत राहायची व मजुरी करून उदरनिर्वाह करायची.

अनैतिक संबंधातून भांडण

संदीप व जयवंता दाेघेही अब्दुल सलीम अब्दुल सत्तार यांच्या माहुली शिवारातील शेतात असलेल्या घरी एकत्र राहायचे. त्यातच या दाेघांनी आराेपी महिला व महेशच्या अनैतिक संबंधाबाबत तिचा पती धनराज याला फाेनवरून माहिती दिली हाेती. याच कारणावरून आराेपी महिला व जयवंताचे घटनेच्या आठ दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यानंतर दाेघांनीही संदीप व जयवंताचा खून करण्याची याेजना आखली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू