चाेरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:39+5:302021-01-02T04:08:39+5:30
या दाेन्ही महिला कडीया (ता. पाचाेरे, जिल्हा रायगड, मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. त्या माैदा शहरातील बँक ऑफ बडाेदाच्या ...

चाेरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला अटकेत
या दाेन्ही महिला कडीया (ता. पाचाेरे, जिल्हा रायगड, मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. त्या माैदा शहरातील बँक ऑफ बडाेदाच्या शाखेत गेल्या हाेत्या. रमेश नत्थूजी टेके (वय ५५, रा. कुंभापूर, ता. माैदा) हे याच बँकेत पीककर्ज भरण्यासाठी साेबत एक लाख रुपये घेऊन आले हाेते. त्यांनी रकमेची पिशवी टेबलवर ठेवली आणि स्लीप लिहायला घेतली. त्याचवेळी या महिलांनी टेके यांचे लक्ष नसताना त्या पिशवीला ब्लेडने चिरा मारला आणि त्यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बँकेतील इतरांच्या लक्षात येताच त्यांनी टेके यांना सावध करीत पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून महिलांना ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९, ५११, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास चांगदेव कुथे करीत आहेत.