शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार, कंत्राटदारांना थकबाकी मिळणार

By योगेश पांडे | Updated: November 3, 2025 18:10 IST

चंद्रशेखर बावनकुळे : कामठी, मालेगाव आणि सिल्लोडमध्ये अनेक ठिकाणी दुबार-तिबार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याच्या चर्चांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुर्णविराम लावला आहे. कंत्राटदारांनी कामे सुरू ठेवावीत. त्यांचे पैसे लवकरच दिले जाईल. नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार असून त्यासाठी सर्व तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बावनकुळे यांनी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते केवळ कारणे शोधत आहेत. त्यांच्या खासदारांनी सुद्धा चुकीच्या मतदार यादीवरून निवडणूक जिंकली, ते मतचोरी करून जिंकले. आता मात्र भाजपवर टीका करत आहेत. अशीच जर मानसिकता त्यांनी कायम ठेवली, तर पुढील २५ वर्ष महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही असे बावनकुळे म्हणाले.

मतदार यादीतील अनियमिततेबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचे म्हणो पूर्णपणे बरोबर आहे. राहुल गांधीचे, कॉंग्रेसचे लांगुलचालन करणारे खरे महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सर्वाना माहित आहे. कामठी, मालेगाव आणि सिल्लोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुबार आणि तिबार मतदार आहेत, काही ठिकाणी चार-चार, पाच-पाच नावे एका कुटुंबात आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला. कामठीत सुमारे आठ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावे दुबार आहेत. या संदर्भात आम्ही यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे त्यांनी सांगितले.

नरखेड येथील व्हायरल ऑडिओ संदर्भात चौकशी २४ तासांत होईल. यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर कठोर कारवाई केली जाईल. पीक विम्यासाठी २ ते ५ रुपयांचे चेक दिल्याच्या माहितीची चाचपणी होत आहे. जुने चेक दाखवून भ्रामक माहिती देण्यात आली का, हेही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्र्यांसाठी दोन नवे टॉवर उभारण्याचा विचार

नागपुरातील अनेक सरकारी बंगले जुने झाले आहेत. त्यामुळे वारंवार दुरुस्तीसाठी उधळपट्टी होते. नागपुरात मंत्री व अधिकाऱ्यांसाठी दोन नवीन टॉवर उभारण्याचा विचार आहे. हेरिटेज नसलेल्या जागी हाय-राईज टॉवर उभारण्याची योजना आहे. रवी भवन नागपूरबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे प्रेझेंटेशन सादर करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Winter Session in Nagpur, Contractors to Get Dues Cleared

Web Summary : The winter session will be in Nagpur. Contractors will receive payments. Bawankule criticized the Maha Vikas Aghadi. Irregularities in voter lists are under investigation. New towers planned for ministers.
टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन