शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत?, अजूनही संभ्रम; तयारी संदर्भात प्रशासकीय बैठका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 08:35 IST

तयारी संदर्भात प्रशासकीय बैठका सुरू, पण अंतिम निर्णय नाही

- कमल शर्मा नागपूर : येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, याची घोषणा आधीच झालेली आहे. बरोबर एक महिन्यानंतर अधिवेशन सुरू होईल. परंतु अधिवेशनाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. कारण हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे तयारी संदर्भात प्रशासकीय बैठका सुरू आहेत. मात्र प्रशासन यासंदर्भात निर्णय झाल्यावरच तयारीला गती देण्याच्या मन:स्थितीत दिसून येत आहेे. 

उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे की, बहुतांश अधिकारी व विदर्भातील मंत्री कोविड संक्रमणाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता अधिवेशन मुंबईतच व्हावे, या विचाराचे आहेत. पुढच्या आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक होणार असून त्यात अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. 

सरकारवर नागपूर कराराचे पालन करण्याचा दबावही आहे. कारण याअंतर्गत नागपुरात वर्षातून एक तरी अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. मागच्या वर्षी कोविड संक्रमणामुळे येथे अधिवेशन होऊ शकले नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोविड संक्रमण लक्षात घेता नागपुरात अधिवेशन घेणे योग्य होणार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरात मोठ्या प्रमाणावर लोकांनी लस घेतली आहे. त्यांची हर्ड इम्युनिटीसुद्धा विकसित झालेली आहे. तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. अधिवेशनासाठी जवळपास १५ हजार लोक बाहेरून येतील. त्यामुळे संक्रमण पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दुसरीकडे अधिवेशनाच्या तयारीलाही गती मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बीएसीच्या बैठकीत काय निर्णय होतो, त्याची प्रतीक्षा आहे. जर बैठकीत नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला तर कामाला गती दिली जाईल. अशा परिस्थितीत २० दिवसांत तयारी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राहील. कारण अधिवेशनाच्या दहा दिवसांपूर्वी सर्व इमारती विधानमंडळाकडे सोपविणे बंधनकारक असते. अशा परिस्थितीत २७ तारखेपर्यंत तयारी पूर्ण करावी लागेल. साधारणपणे अधिवेशनाच्या तयारीचे काम दोन महिन्यांत पूर्ण होते.

आतापर्यंत वर्क ऑर्डर नाही

पीडब्ल्यूडीने तयारीसाठी ५० कोटी रुपयांच्या निविदा जारी केल्या आहेत. दरांमध्ये झालेल्या तफावतीमुळे अनेक निविदा रद्द करून त्या पुन्हा जारी कराव्या लागल्या. परंतु आतापर्यंत वर्क ऑर्डर जारी झालेले नाही. नागपुरात अधिवेशन होईल, याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावरच वर्क ऑर्डर जारी केले जातील, असे सांगितले जाते. 

कॅबिनेटमध्ये होणार चर्चा - पालकमंत्री 

नागपूर करार अंतर्गत शहरात अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. परंतु सध्या कोविड संक्रमण पाहता शहरातील सुरक्षेचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशनाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. नागपुरात कठोर कोविड प्रोटोकॉलमध्ये अधिवेशन होईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरे