जातिगत जनगणनेला संघ व भाजपने समर्थन द्यावे; अमोल मिटकरी यांची मागणी

By मंगेश व्यवहारे | Published: December 19, 2023 10:38 AM2023-12-19T10:38:05+5:302023-12-19T10:38:48+5:30

सरकार 24 तारखेच्या आत मराठा समाजाला न्याय देईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Winter Session Maharashtra Sangh and BJP should support caste census mla Amol Mitkari's demand | जातिगत जनगणनेला संघ व भाजपने समर्थन द्यावे; अमोल मिटकरी यांची मागणी

जातिगत जनगणनेला संघ व भाजपने समर्थन द्यावे; अमोल मिटकरी यांची मागणी

नागपूर : जातिगत जनगणना झालीच पाहिजे, नेहरूजींच्या काळात ती होत होती नितेश कुमारने ती करून दाखवली. महाराष्ट्रात जातीगत जनगणना झाली तर कोणाला किती वाटा आहे हे कळेल व आरक्षणाचा तिढा सुटेल, त्यासाठी भाजप आणि संघाने समर्थन करण्याची गरज असल्याची भावना परिषदेचे आमदार  अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.  सरकार 24 तारखेच्या आत मराठा समाजाला न्याय देईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 उद्धव ठाकरें शी  काल झालेल्या भेटी संदर्भात ते म्हणाले की  ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांचा एक मानसन्मान आहे म्हणून त्यांना मी नमस्कार केला त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.  काही  गोष्टी प्रकट करायच्या नसतात.  उद्धव साहेबांनी माझ्याशी आपुलकीचा संवाद केला वैयक्तिक संवाद होता. मी मंत्र स्वीकारणारा माणूस नाही हा पारिवारिक संवाद होता असे मिटकरी म्हणाले. 

- पॅकेज अंमलबजावणी होईल

 शेतकरी पॅकेज जाहीर करणे व त्याची अंमलबजावणी करणे या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक सरकार शेतकरी पॅकेज घोषित करते.  परंतु आमचे सरकार त्याची  तात्काळ अंमलबजावणी करेल, असेही मिटकरी म्हणाले.

Web Title: Winter Session Maharashtra Sangh and BJP should support caste census mla Amol Mitkari's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.