शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:03 IST

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

ठळक मुद्देधरणात ३४ टक्केच पाणीसाठानागपूर विभागात ३५ टक्के तर अमरावती विभागात ३३ टक्के जलसाठा

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला पेंच धरणाचा मोठा आधार आहे. पण मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरण पुरेसे भरलेले नाही. त्यामुळे नागपूर शहराला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावरही काही प्रमाणात निर्बंध यायला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमध्ये असलेला मर्यादित पाणीसाठा विचारात घेता नागपुरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगतानाच महापालिकेकडून नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे आॅडिट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर विदर्भात अवघा ३२.३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या तुलनेत सध्या विदर्भातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन हिवाळ्यातच विदर्भातील बऱ्याच भागात पाणीटंचाईची झळ पोहोचायला लागली आहे. नागपूरसारख्या शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. जे पाणी शिल्लक आहे, ते पिण्यासाठी पुरेसे आहे, असे सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात पण आणीबाणीप्रमाणे काटकसर करून पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्लाही सिंचन विभाग देत आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत ही पाणीटंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण