हिवाळी अधिवेशन २०१९; ‘हे जन्मभूमी हे कर्मभूमी’ चिमुकल्यांनी गायले गाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:16 IST2019-12-21T16:15:49+5:302019-12-21T16:16:26+5:30
हे जन्मभूमी.. हे कर्मभूमी असे देशभक्तीगीत गाणारी चिमुकली मंडळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कक्षात अवतरली होती.

हिवाळी अधिवेशन २०१९; ‘हे जन्मभूमी हे कर्मभूमी’ चिमुकल्यांनी गायले गाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हिवाळी अधिवेशनात विधान भवन परिसराला दणाणून टाकणाऱ्या घोषणांच्या आवाजाची कानाला सवय झाली असताना, शनिवारी सकाळी अचानक लहानग्या कोवळ्या स्वरांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हे जन्मभूमी.. हे कर्मभूमी असे देशभक्तीगीत गाणारी चिमुकली मंडळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कक्षात अवतरली होती. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना अधिवेशनस्थळाची माहिती देण्यासाठी आमंत्रित केले जात असते. याच उपक्रमाअंतर्गत आलेल्या एका शाळेतील मुलामुलींनी अतिशय सुरेल व कोवळ्या स्वरातील हे गीत सादर केले तेव्हा अध्यक्ष पटोले यांच्यासह सगळ्यानीच आपापल्या हातातले काम थांबवून त्या चिमुरड्यांचे कौतुक केले. नाना पटोले यांनीही आपल्या व्यस्त कार्यक्रमात या मुलांसाठी खास वेळ काढला. त्यांच्याशी गप्पा मारल्या व फोटोसेशनही केले व त्यांना खाऊही दिला. देशाचे भावी नागरिक असलेल्या या मुलांसाठी हिवाळी अधिवेशनला भेट हा एक अविस्मरणीय दिवस राहिला असणार यात शंका नाही.