देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास शिकविणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:45 IST2019-07-10T23:44:08+5:302019-07-10T23:45:18+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापीठातून शिकविला जाणार का, असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाने उपस्थित केला आहे. हा धडा तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन दिला.

देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास शिकविणार का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापीठातून शिकविला जाणार का, असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाने उपस्थित केला आहे. हा धडा तातडीने हटविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांनी बुधवारी पत्रपरिषद घेऊन दिला.
डबरासे म्हणाले, आरएसएसने स्वातंत्र्याच्या लढ्याला विरोध केला होता. १९४२ च्या चले जाव आंदोलनाला त्यांनी विरोध केला होता. तसेच ५२ वर्षापर्यंत आरएसएसने देशाचा राष्ट्रध्वज कधीच फडकवला नाही. हा आरएसएसचा खरा इतिहास आहे. तेव्हा बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) पूर्ण एक धडा सामील करणे, पूर्णपणे अवैध आहे. देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाºयांचा इतिहास अभ्यासक्रमात आम्ही सामील होऊ देणार नाही, याबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल. विद्यापीठाने तातडीने हा धडा मागे न घेतल्यास भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी याविरुद्ध राज्यभरात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष रवी शेंडे, नीतेश जंगले, राजू जंगले, संदीप मेश्राम, राजेश रंगारी, अतुल शेंडे उपस्थित होते.
निवडणुका बॅलेट पेपरनेच व्हाव्यात
ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला. बहुतांश ठिकाणी झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी करण्यात आलेल्या मतदानात फरक आढळून आला आहे. तेव्हा यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरनेच घेण्यात याव्यात, अशी मागणीसुद्धा सागर डबरासे यांनी यावेळी केली.