कधी मिळेल स्थायी पत्ता?
By Admin | Updated: September 5, 2016 02:39 IST2016-09-05T02:39:59+5:302016-09-05T02:39:59+5:30
लाखो लोकांची पत्रे त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचविणाऱ्या पोस्ट आॅफिसलाच सध्या स्थायी पत्त्याच्या शोधात भटकावे लागत आहे.

कधी मिळेल स्थायी पत्ता?
जरीपटका पोस्ट आॅफिसचे दोन महिन्यात दोन ठिकाणी स्थानांतरण : आता उप्पलवाडीच्या आश्रयाला
नागपूर : लाखो लोकांची पत्रे त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचविणाऱ्या पोस्ट आॅफिसलाच सध्या स्थायी पत्त्याच्या शोधात भटकावे लागत आहे. वाचायला विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे.
जरीपटक्यातील पोस्ट आॅफिसचे दोन महिन्यात दोन ठिकाणी स्थानांतरण झाले आहे. मागच्या ६० वर्षांचा इतिहास पाहिला तर या कार्यालयाने तब्बल सात ठिकाणचा प्रवास केला आहे. सध्या या आॅफिसला उप्पलवाडीत शिफ्ट केले जात आहे. परंतु हे ठिकाणसुद्धा स्थायी नाही.
अनेक असुविधा असलेल्या ठिकाणी या पोस्ट आॅफिसला स्थानांतरित केल्याने स्थानीय नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अखेर या प्रकाराची चौकशी करण्यात आली. यात नागरिकांना असुविधा होत असल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ या पोस्ट आॅफिसला दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले. अनेक वर्षाआधीपर्यंत हे पोस्ट आॅफिस जरीपटका बस स्टॉपजवळ होते. यानंतर सेतिया चौक आणि नंतर अॅड. ममतानी सत्संग हॉलजवळ व सात वर्षांआधी या पोस्ट आॅफिसला महात्मा गांधी शाळेजवळील समता भवनात स्थानांतरित करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षानंतर घरमालकाने भाडे वाढवून मागितले व न वाढवून दिल्यास घर रिकामे करण्याचा तगादा लावला. यानंतर मशीन मोहल्ला येथे एक जागा निवडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पोस्ट आफिस
मोठी जागा असलेल्या समता भवनचे भाडे ८००० रुपये होते आणि मशीन मोहल्ला येथील छोट्या जागेचे भाडे १९ हजार ५०० इतके ठरवण्यात आले.
समता भवनातून मशीन मोहल्ला येथे एका रात्रीत कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आले. या प्रकाराने स्थानिक नागरिक व एजंट नाराज झाले. मशीन मोहल्ला येथील पोस्ट आफिसमध्ये एजंटस्नी पैसे जमा करणे बंद केले.
यानंतर बेझनबागेत दोन नवीन कांऊटर सुरू करण्यात आले. (प्रतिनिधी)