शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नैऋत्य मान्सून १३ मे पर्यंत अंदमानात पाेहचणार?

By निशांत वानखेडे | Updated: May 8, 2025 18:39 IST

Nagpur : पण महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास परिस्थितीवर अवलंबून

निशांत वानखेडेनागपूर : नैऋत्य मान्सून, म्हणजेच भारतीय मान्सून म्हणजेच यंदाचा पावसाळा भारतीय महासागरांच्या सीमेवर लवकर दाखल हाेईल, असा अंदाज आहे. प्रशांत महासागरातून सुरू झालेला मान्सून मलेशिया, सिंगापुर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून १३ मे पर्यंत म्हणजे येत्या पाच दिवसात भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल हाेईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, सध्या ला-निनाे व अल-निनाे न्यूट्रल म्हणजे तटस्थ स्थितीत आहेत. शिवाय भारतीय महासागरीय द्विध्रुविता (आयओडी) हा सुद्धा तटस्थ स्थितीत आहे. या दाेन्ही घटकांचा मान्सूनच्या प्रवासाशी संबंध जाेडता येणार नाही. मार्गातील नैसर्गिक परिस्थितीवर त्याचा वेग व वाटचाल अवलंबून आहे. मात्र ताे अंदमानात वेळेपूर्वी दाखल हाेईल, ही शक्यता सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले. वाढलेल्या तापमानामुळे बहुतेक सागरी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनला गती मिळाली, असे काहींचे मत आहे.

दरम्यान ताे अंदमानात आला म्हणजे ताे लवकरच केरळात आणि तिथून निर्धारीत १० जून पर्यंत महाराष्ट्रात पाेहचेल, असा अंदाज बांधता येणार नाही, हेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. बरेचदा अंदमानात पाेहचला किंवा तिथून ताे केरळपर्यंत पाेहचला, तरी तेथील नैसर्गिक परिस्थितीमुळे ताे बरेच दिवस तेथे रेंगाळत असताे. गेल्या वर्षी अशीच स्थिती हाेती. निर्धारीत १ जून किंवा त्यापूर्वी अंदमानातून केरळपर्यंत पाेहचल्यानंतरही ताे कर्नाटक मार्गे महाराष्ट्रात वेळेत पाेहचेल की उशीरा, याबाबत ३१ मे पर्यंत स्पष्ट हाेईल, असे खुळे यांनी सांगितले.

विदर्भाला करावी लागेल प्रतीक्षानागपूरसह विदर्भात केरळकडून येणाऱ्या नैऋत्य माेसमी वाऱ्यामुळे नाही, तर बंगालच्या खाडीकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस येताे. विदर्भात मान्सून पाेहचण्यासाठी १६ जून ही तारीख निर्धारीत मानली जाते. मात्र गेल्या वर्षी २२ जूनला मान्सूनचा पाऊस पडला हाेता, पण त्यानंतरही जैलपर्यंत हुलकावणी दिली हाेती. त्यामुळे यावेळी काय हाेईल, हे त्यावेळच्या नैसर्गिक स्थितीवर अवलंबून असेल.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र