गठई कामगारांचा प्रश्न सोडविणार

By Admin | Updated: September 2, 2014 01:11 IST2014-09-02T01:11:37+5:302014-09-02T01:11:37+5:30

नागपूर महापालिकेच्यावतीने कॅम्पस चौक ते अंबाझरी उद्यान या रस्त्याला चर्मकार समाजाचे आद्यदैवत संत शिरोमणी रविदास महाराज मार्गाचे नामकरण करण्यात आले. रस्त्याच्या नामकरणासंदर्भात

Will solve the problems of the workers gathering | गठई कामगारांचा प्रश्न सोडविणार

गठई कामगारांचा प्रश्न सोडविणार

कॅम्पस चौक ते अंबाझरी उद्यान रस्त्याला रविदास महाराजांचे नाव
नागपूर : नागपूर महापालिकेच्यावतीने कॅम्पस चौक ते अंबाझरी उद्यान या रस्त्याला चर्मकार समाजाचे आद्यदैवत संत शिरोमणी रविदास महाराज मार्गाचे नामकरण करण्यात आले. रस्त्याच्या नामकरणासंदर्भात प्रभागाचे नगरसेवक डॉ. परिणय फुके यांनी प्रयत्न केले होते. डॉ. फुके यांनी केलेल्या पाठपुराव्याची मनपाने दखल घेतली असून, महापालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, चर्मकार समाजातील गठई कामगारांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार.
या नामकरण सोहळ्याला महापौर अनिल सोले, उपमहापौर जैतुनबी अन्सारी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भय्यासाहेब बिघाणे, धरमपेठ झोनचे सहा.आयुक्त राजेश कराडे, स्वागताध्यक्ष म्हणून नगरसेवक डॉ़ परिणय फुके उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर चर्मकार समाजाचे पदाधिकारी केशवराव सेवतकर, श्यामराव सरोदे, मधुकर बर्वे, शंकर भागवतकर, प्रकाश कुहीकर, कल्पना बसेशंकर, सीताबाई नांदूरकर उपस्थित होते़
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना परिणय फुके म्हणाले की, माझे वडील व भय्यासाहेब बिघाणे हे मित्र होते आणि त्यांच्याचमुळे मी या समाजाशी जुळलो. या समाजासाठी काही करावे अशी भावना होती़ त्यामुळेच मी गठई कामगारांच्या मागणीसाठी पुढाकार घेतला़ मागील अनेक वर्षांपासून मागणी होती की, अंबाझरी उद्यान ते कॅम्पस चौक या मार्गाचे चर्मकार समाजाचे आद्यदैवत श्री संत शिरोमणी रविदास मार्ग म्हणून घोषित करावा़ यासंदर्भात चर्मकार समाजाने मला एक निवेदनसुद्घा दिले होते़ या विषयावर मी चर्मकार समाजबांधवांना घेऊन महापौर व आयुक्तांना निवेदन दिले व त्यांच्याशी चर्चा केली होती़ हेच निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनासुद्घा दिले होते. त्याचबरोबर चर्मकार समाजाचे नागपूर शहरात समाज भवनसुद्घा असावे़, अशीही आमची मागणी होती. आज या रस्त्याला रविदास मार्ग नाव देण्यात आल्याने मी फार आनंदी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भय्यासाहेब बिघाणे यांनी केले. संचालन अनंत जगनित तर आभारप्रदर्शन पंजाबराव सोनेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाऊराव तांडेकर, राजू मोहबे, संजय बडखाने, मोहन सोनेकर, कैलाश धोत्रे, राजेश सोनेकर, नामदेव गणेशकर, रमेश सटवे, हरिचंद वाघमारे, बंडूजी तांडेकर, विजय चवरे, श्याम सोनेकर, अंजनाबाई चवरे, रोहिणी चौधरी, ललिता भोंडेकर, कुसुम मालखेडे, मनोज बिंझाडे, तिलकचंद कनोजे, देवानंद छिपेकर, प्रल्हाद जगनित, मनोज हिंगणकर, दिनेश पहाडे, शंकर बिघाणे, दीपक सरोदे, जमरू लुधियान, माणिक तेलोते, संपत मोहबिया, कृष्णा भोंडेकर, अनिल मोहबे, ब्रिजलाल तांडेकर, शिकारी भोंडेकर, राजकुमार बिजलेकर, महेंद्र जगणे, रामकृष्ण सेवतकर, डायमन तांडेकर, बडीराम तांडेकर, रामा सेवतकर, शामराव चांदेकर, नरेश चौधरी, राकेश छत्री, संतोष ठवरे, नरेश घोरे, दिनेश चापके, नीळकंठ इंगळे, वेणू गायकवाड, ऋषी महेंद्रकर, दिगंबर उचितकर, धनराज गायकवाड, अर्चना गिरड, महादेव बोडखे, माणिकराव रामेकर, मधुकर वासनकर, महेंद्र बोरकर, प्रकाश काळे, दामोदर चांदेकर, रवी काकडे, अशोक चापके, संगीता वासनकर, राजू नाचणे, तुळशीराम चांदेकर, देवीदास ढोले, चंद्रकला मानेकर, रूपेश धापेकर, अशोक कोलते यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
गडकरी व फडणवीसांनी दिला संदेश
कार्यक्रमात व्यक्तीश: उपस्थित राहू न शकल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ चित्रफितीद्वारे उपस्थितांना संदेश दिला. यात ते म्हणाले की, उपाशीपोटी तत्वज्ञान कामाचे नाही, ही स्वामी विवेकानंदाची भूमिका होती व तेच कार्य संत रविदासांनी त्यापूर्वी केले होते़ याची आठवण करून ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करणे हीच २१ व्या शतकातील मोठी उपलब्धी आहे़ संत रविदासांचे नावाने भवन निर्माण व्हावे, यासाठी जागा निश्चित करण्यात येईल, तसेच त्यांचा पुतळा स्थापित करण्यासाठी नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली़ आमदार देवेन्द्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहू न शकल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी व्हॉट्सअप च्या माध्यमातून संदेश दिला. नगरसेवक परिणय फुके यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक सुद्घा केले़

Web Title: Will solve the problems of the workers gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.