बिडीपेठेतील झुडपी जंगलाचा प्रश्न सुटणार

By Admin | Updated: August 12, 2014 01:32 IST2014-08-12T01:09:11+5:302014-08-12T01:32:15+5:30

आ. दीनानाथ पडोळे यांनी दक्षिण नागपुरातील प्रभाग क्ऱ ६३, बिडीपेठ येथील आदिवासीनगर, सुदर्शननगर येथील परिसराचा पाहणी दौरा केला.

Will the question of shrines of Bidypeet forest be addressed? | बिडीपेठेतील झुडपी जंगलाचा प्रश्न सुटणार

बिडीपेठेतील झुडपी जंगलाचा प्रश्न सुटणार

दीनानाथ पडोळे यांनी केली पाहणी
नागपूर : आ. दीनानाथ पडोळे यांनी दक्षिण नागपुरातील प्रभाग क्ऱ ६३, बिडीपेठ येथील आदिवासीनगर, सुदर्शननगर येथील परिसराचा पाहणी दौरा केला.
पाहणीच्या दौऱ्याच्यावेळी आदिवासीनगर येथील नागरिकांनी येथील नाल्याचे पाणी पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरून अन्नधान्य व सामान खराब होत असल्याची तक्रार केली व परिसरात एक बोअरवेल लावण्याची मागणी करण्यात आली़ तसेच सुदर्शननगर परिसरातील झुडपी जंगलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नगरसेवक दीपक कापसे व बापूराव निंदेकर यांनी केली़
त्यावर आ. पडोळे यांनी नुकतेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र देऊन हा प्रश्न निकाली काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. त्यावर महसूल विभागात चौकशी केली असता प्रकरण निकाली काढण्याची कार्यवाही सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले़ तसेच परिसरात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण, गडर लाईन, फुटपाथ व इतर कामांची पाहणी केली़ यावेळी नगरसेवक दीपक कापसे, प्रभाग अध्यक्ष राजेश बेलखोडे, दिलीप घोरपडे, विजय सालोडकर, प्रदीप मठले, गिरीश पंडकुलवार, श्रावण साठवणे, संगीता उपरीकर, सौ़ माधुरी नंदनघरे, कुंदा खरडेकर, योगेश वैद्य, सुरेंद्र नागपुरे, वासुदवे कुदिसे, मानसिंग राहंगडाले, राजेश बहाड, नथ्थुजी गायधने, अनिरुध्द उपरीकर, नंदनघरे, ओंकारेश्वर खंडवे, शोभा चोपडे, मंजु पारधी, वंदना निमकर, मंगला वैद्य, सीमा वैरागडे, अर्चना तनेश्वर, सप्तफुला उईके आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Will the question of shrines of Bidypeet forest be addressed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.