निधी कमी पडू देणार नाही!
By Admin | Updated: August 25, 2014 01:15 IST2014-08-25T01:15:35+5:302014-08-25T01:15:35+5:30
कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे व्हावीत, असा आपला मानस आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही

निधी कमी पडू देणार नाही!
चंद्रशेखर बावनकुळे : येरखेडा येथे विविध कामांचे भूमिपूजन
नागपूर : कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे व्हावीत, असा आपला मानस आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कामठी तालुक्यातील रनाळा व येरखेडा येथे शनिवारी बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी येरखेडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती संगीता तांबे, उपसभापती विमल साबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, अनिल निधान, मोबीन पटेल, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गवते, सरपंच सीमा बावणे, उपसरपंच सुधीर अपाले, उमेश महल्ले, वसंत काळे, अशोक महल्ले, नीता वाहूरवाघ, अंकिता आगासे आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, कामठी तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो. लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केलीत. या कामात यापुढेही आपण खंड पडू देणार नाही. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटचा घटक व प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बावनकुळे यांच्या हस्ते येरखेडा येथील भरत टाऊन रस्ता बांधकाम, येरखेडा-कळमना जोड रस्ता दुरुस्ती, येरखेडा येथील साठवणूक बंधारा, लाईफ लाईन हॉस्पिटल ते रनाळा रोड, रनाळा येथील अंतर्गत रोड, रनाळा येथील साठवणूक बंधारा आदी विकास कामांचे भूूमिपूजन करण्यात आले. यशस्वितेसाठी अरुण पोटभरे, संगीता मोहबे, मनीष जयस्वाल, सचिन ठवकर, रेखा मराठे, शालिनी भस्मे, डॉ. नासीर खान, इंदिरा वंजारी, संध्या रायबोले, शीतल चौधरी, अंकिता तळवेकर, स्वप्निल फुकटे, जयंत मेश्राम, हेमंत गोरखा, राजेश पिपरेवार, बिट्टू चकोले, अरविंद डोंगरे, रंजना वंजारी, ख्याती गणेर, श्रीराम कुशवाह, किशोर घडे, भारती धानोरकर, दादू भस्मे, प्रदीप सपाटे, श्रीकांत पेटारे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)