शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वैभव मोतीबाग डिझेल लोकोशेड बंद होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:54 IST

अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकामगारांना पाठविताहेत इतरत्र : ब्रॉडगेज इंजिनचे काम सुरू करण्याची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.भारतीय रेल्वेत सर्वत्र नॅरोगेज होते. आधुनिक काळात नॅरोगेजऐवजी आता सर्वत्र ब्रॉडगेज मार्ग होत आहेत. कधी काळी वाफेवर चालणारे इंजिन, त्यानंतर डिझेल आणि आता विजेवर धावणारे इंजिन वापरण्यात येत आहे. त्यामुळे डिझेल इंजिन मागे पडत आहेत. नागपूर विभागात नॅरोगेज आणि डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात असल्याने मोतीबाग डिझेल लोकोशेड सुरू झाले. येथे नॅरोगेज इंजिनच्या देखभाल-दुरुस्तीची कामे व्हायची. काळाच्या ओघात नॅरोगेज रेल्वे इतिहासजमा झाली. त्यामुळे मोतीबाग शेडला उतरती कळा लागली. आता केवळ नागपूर-नागभीड हा एकच नॅरोगेज मार्ग शिल्लक आहे. लोकोशेडमधील काम कमी झाल्याने २०१५-१६ मध्ये कोट्यवधींचा खर्च करून ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. शेडला २५ ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीची मान्यता असून, हळूहळू शेडची क्षमता ४० लोकोपर्यंत नेण्याची ग्वाही देण्यात आली होती. येथे इलेक्ट्रिक, मेकॅनिक, स्टोअर, व्यवस्थापन हे विभाग असले तरी कामगारांची संख्या केवळ २५० वर आली आहे. आज महिन्याकाठी सरासरी केवळ ११ नॅरोगेज इंजिन आणि १४ ब्रॉडगेजचीच देखभाल-दुरुस्ती होत आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविले जात आहे. त्याविरोधात कामगारांनी आंदोलनही उभारले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी शेड बंद होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली होती. परंतु आता मोतीबाग लोकोशेडमधील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत असल्यामुळे हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी चर्चा होत आहे.कामगारांची बदलीमोतीबाग लोकोशेडमध्ये १० ते १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या कामगारांना अपग्रेड करून त्यांची गोंदियाला बदली करण्यात आली आहे. महिनाभरात नवीन जागी रुजू व्हा, अन्यथा बढती रद्द करण्यात येईल, असा इशारासुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आहे.

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारी