अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST2021-05-28T04:06:57+5:302021-05-28T04:06:57+5:30

नागपूर : कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे व अन्य साहित्य देण्याची योजना मागील वर्षीपासून सुरू केली ...

Will I get subsidized seeds, brother? | अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?

अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?

नागपूर : कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे व अन्य साहित्य देण्याची योजना मागील वर्षीपासून सुरू केली आहे. जिल्ह्यात ३ लाख १२ हजारांवर खातेदार शेतकरी आहेत. मात्र, बियाण्यांसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या फक्त १३,२७५ आहे. शेतकऱ्यांच्या या अल्प प्रतिसादाचा कृषी विभागाला अभ्यास करावा लागणार आहे.

अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी २४ मेच्या रात्रीपर्यंत होती. नागपूर जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी कृषी विभागाने आवाहन केले होते. तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यासाठी माहितीही देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपल्यावर उमटलेले चित्र निराशाजनक आहे. बियाण्यांच्या मागणीसोबतच कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादान आणि एससी, एससी शेतकऱ्यांसाठीच्या योजनांसाठीही पोर्टलवर नोंदणी झाली होती. त्यासाठीही प्रतिसाद कमीच आहे.

...

जिल्ह्यातून ३६,६८४ हजार अर्ज

महाडीबीटी पोर्टलवर नागपूर जिल्ह्यातून पाचही योजनांसाठी मिळून ३६ हजार ६८४ अर्ज आले. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पदान आणि अनउ. जाती- जमाती शेतकऱ्यांसाठीच्या योजना, तसेच बियाणे यासाठी ऑनलाइन अर्ज करायचे होते. बियाण्यांची गरज सर्वच शेतकऱ्यांना असल्याने अधिक मागणी राहील, असा अंदाज होता; परंतु फक्त १३,२७५ अर्ज आले.

...

पॉइंटर्स

कोणत्या योजनेसाठी किती अर्ज?

अ - कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ८,०४३ अर्ज आले. लॉटरीनंतर ९४४ शेतकरी यासाठी पात्र ठरले.

ब - सिंचन (सूक्ष्मसिंचन) योजनेसाठी ९,७९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यातील ३,५६६ शेतकऱ्यांना लॉटरी निघाली.

क - फलोत्पादन योजनेसाठी प्रतिसाद कमी मिळाला. ३,००७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. फक्त ३६ शेतकऱ्यांना लॉटली लागली.

ड- बियाणे खरेदी योजनेसाठी १३,२७५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. याची सोडत गुरुवारपर्यंत झालेली नव्हती.

ई - अजा, अज शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून योजना राबविल्या जातात. यासाठी २,५६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १,२९५ शेतकऱ्यांची लॉटरी निघाली.

...

सर्वाधिक अर्ज यांत्रिक शेतीसाठी

महाडीबीटी पोर्टलवर सर्वाधिक अर्ज यांत्रिक शेतीसाठी आले आहेत. ८ हजार ०४३ शेतकऱ्यांनी यासाठी पोर्टलवर नावनोंदणी केली. यावरून शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे कल वाढल्याचे दिसत आहे. असे असले तरी ९४४ शेतकरीच यासाठी पात्र ठरले.

...

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

- मागील वर्षी नोंदणी केली होती. मात्र, वेळेवर बियाणे मिळाले नाही. बियाण्यातून समाधान झाले नाही. त्यामुळे यंदा नोंदणीच केली नाही.

-धनराज अरसडे, खरसोली

.

- यंदा प्रथमच ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली आहे. अद्याप लॉटरी निघायची आहे. अर्ध्या किमतीमध्ये बियाणे मिळणार असल्याने हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे.

-संदेश देशमुख, वडविहिरा

...

बॉक्स

एसएमएस आला, तरच मिळणार अनुदानित बियाणे

सोडत काढल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येईल त्यांनाच अनुदानित बियाणे मिळेल. यासाठी शेतकऱ्याच्या नोंदणी केलेल्या मोबाइलवर संदेश येईल. त्यात शेतकऱ्यांचा अप्लिकेशन आयडी आणि पासवर्डची माहिती असेल.

...

बॉक्स

एसएमएस आला तर...

एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सेतू केंद्रातून योजनेशी संबंधित कागदपत्रे डाऊनलोड करून घ्यावी. घरूनही आपल्या ॲनराइड मोबाइलवरून ही प्रक्रिया करता येईल.

...

Web Title: Will I get subsidized seeds, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.