शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

नगरसेवकांना ‘अच्छे दिन’ पण येतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षात शहरात कोणत्याही प्रकारची नवीन विकास कामे झालेली नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षात शहरात कोणत्याही प्रकारची नवीन विकास कामे झालेली नाही. प्रभागातील गडरलाईन, नाल्या दुरुस्तीसाठी नगरसेवकांना निधी मिळालेला नाही. यामुळे नागरिकात प्रचंड रोष आहे. पुढील वर्षात महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना हा रोष कमी व्हावा, प्रभागातील विकास कामे करता यावी, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी रस्ते, आरोग्यविषयक सुविधा व प्रभागातील कामासाठी सर्वाधिक आर्थिक तरतूद असलेला सन २०२१-२२ या वर्षाचा २७९६.०७ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी विशेष सभेत महापौर दयाशंकर तिवारी यांना सादर केला. नगरसेवकांना २० लाखाचा निधी देतानाच रस्ते, नाल्या दुरुस्ती व विकास कामासाठी ३०० कोटीहून अधिक तरतूद केल्याने निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना ‘अच्छे दिन’येणार आहेत. परंतु गेल्या वर्षीचा अनुभव विचारात घेता, अच्छे दिन अस्तित्वात येतील का? हा प्रश्नच आहे.

निवडणुकीचा विचार करता प्रकाश भोयर यांनी मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा लवकर अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी २७३१. कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रलंबित कामांसाठी ३०० कोटींची तरतूद केली होती. परंतु प्रशासनाने निधी दिला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ६५.० ७ कोटींनी अधिक रकमेचा अर्थसंकल्प दिला. यात १६०६.३६ कोटींच्या महसुली व भांडवली अनुदानाचा समावेश आहे. कोरोनाचा उत्पन्नावर झालेला परिणाम विचारात घेता, अर्थसंकल्पात नवीन बाबींचा समावेश न करता जुन्याच योजना व प्रकल्प पूर्ण कसे होतील, यावर भर देण्यात आला आहे.

मालमत्ता करापासून २८९.४३ कोटी अपेक्षित आहे. मागील वर्षी २२३.३५ कोटी गृहित धरले होते. पाणीपट्टीतून २०१.०२ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १७५ कोटी गृहित धरण्यात आले होते. नगर रचना विभागाकडून ८६.१९ कोटी अपेक्षित आहे. मागील वर्षात ११०.५० कोटी गृहित धरले होते.

मनपाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीटसाठी २५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी यासाठी १३ कोटीची तरतूद होती. परंतु वर्षभरात कोणतेही काम झाले नाही. मनपाच्या परिवहन सेवेसाठी अर्थसंकल्पात १०८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

....

रस्त्याच्या कामासाठी सर्वाधिक निधी

आयआरडीपी, क्रीप रस्त्याची सुस्थिती व दुरुस्तीसाठी १००.७१ कोटी, एकात्मिक रस्ते सुधारणासाठी ९० कोटी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमासाठी ६३.१६ कोटी, नवीन पुलांचे निर्माण १० कोटी, रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी १८.३६ कोटी, दवाखाना निर्माण व विस्तारासाठी १९.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

......

आरोग्यावर विशेष भर

कोरोनाचे संकट आल्यानंतर महापालिकेने सार्वजनिक स्वच्छता व सार्वजनिक आरोग्यावर प्रशासनाने अंदाजपत्रकात विशेष भर दिला आहे. या अंदाजपत्रकात घनकचरा व्यवस्थापनाकरिता १०३.२८ कोटी, तर सार्वजनिक आरोग्याकरिता ५५.४५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अंदाजपत्रकात गरोबा मैदान येथील जीर्ण शाळा पाडून वैद्यकीय प्रयोगशाळा व रोगनिदान करणारी प्रयोगशाळा उभारण्यासाठी पाच कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

...

प्रस्तावित उत्पन्न (कोटीमध्ये)

स्थानिक संस्था कर ४.००

मालमत्ता कर २८९.४३

महसुली अनुदान आय १४१८.८०

जलप्रदाय २०१.०२

बाजार ०.५१

स्थावर ४.९५

अग्निशामक १.७२

नगर रचना ८६.१९

आरोग्य ८.८४

लोककर्म ०.८१

विद्युत १२.५०

हॉटमिक्स प्लान्ट ५.०१

इतर विभागांची करेतर आय २९.१८

इतर विभागांची इतर आय ४७.६८

भांडवली अनुदान १८७.५५

भांडवली कर्ज ५०.००

निक्षेप व ठेवी ११५.८०

अग्रीम आय १२.०७

---------------------------------------------

प्रस्तावित खर्च (कोटीमध्ये)

आस्थापना ६८५.१६

प्रशासकीय ८३.१२

प्रवर्तन, दुरुस्ती ४२७.२१

महसुली ५.१०

मनपाच्या योजना २००.१६

भांडवली निर्माण ८००.८०

भांडवली अनुदान ३६४.२१

कर्ज परतफेड १०१.०१

अंशदान, अनुदान ३२.४८

निक्षेप व ठेवी ८०.८६

अग्रीम व्यय १५.६५