शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा १९ तारखेलाच नागपुरात येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:57 IST

१८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा हे १९ तारखेलाच नागपुरात येण्याची शक्यता असून त्याच दिवशी सभा होऊ शकते.

ठळक मुद्देभाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाधिवेशन : मुख्यमंत्री, गडकरींची राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा हे १९ तारखेलाच नागपुरात येण्याची शक्यता असून त्याच दिवशी सभा होऊ शकते.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महाधिवेशनाला महत्त्व आले आहे. अधिवेशनात ४ हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सोबतच १३ केंद्रीय मंत्री व विविध राज्यांतील मंत्री, राज्यमंत्री मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल महाधिवेशनात मार्गदर्शन करतील. नियोजित वेळापत्रकानुसार अमित शहा यांची सभा २० जानेवारी रोजी कस्तूरचंद पार्क येथे होणार आहे. मात्र काही पक्ष मुख्यालयात त्याच दिवशी काही महत्त्वाच्या बैठकादेखील असल्याने शहा हे १९ जानेवारी रोजी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता अमित शहा यांची सभा १९ जानेवारी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याची रुपरेषा लवकरच निश्चित होईल असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शहर भाजपानेदेखील महाधिवेशनाची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. सातत्याने बैठकादेखील सुरू आहेत. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून तेथे भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार उपस्थित होते. यावेळी आ.मिलिंद माने, अनुसूचित जाती मोर्चाचेराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे,विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, महामंत्री संदीप जाधव, किशोर पलांदुरकर, भोजराज डुंबे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, अर्चना डेहनकर, प्रगती पाटील, दिव्या धुरडे, दयाशंकर तिवारी इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा