सुटीच्या दिवशीही वीज देयके स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST2021-02-20T04:21:03+5:302021-02-20T04:21:03+5:30
नागपूर : महावितरणकडून थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज देयकाची वसुली मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. थकीत वीज देयकाची रक्कम ...

सुटीच्या दिवशीही वीज देयके स्वीकारणार
नागपूर : महावितरणकडून थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज देयकाची वसुली मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. थकीत वीज देयकाची रक्कम भरू न शकलेल्या वीज ग्राहकांना वीज बिल भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सुमारे १९० वीज बिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवारी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.
वीज बिल केंद्र शिवाय वीज ग्राहकांना महावितरण मोबाइल ॲप आणि ऑनलाइनद्वारे वीज देयकाची रक्कम भरता येते. महावितरण मोबाइलला ॲप गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करता येते. महावितरणच्या संकेतस्थळावरून वीज ग्राहक नेट बँकिंग, डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वीज देयकाचे पैसे भरू शकतात. विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीज बिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून आपल्या चालू व थकीत वीज बिलाचा भरणा करावा, असे त्यांनी सांगितले.