सिंगारखेडा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:03+5:302021-01-03T04:10:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सिंगारखेडा (ता. नरखेड) शिरावात २० दिवसांपासून रानडुक्कर व राेह्यांचा उपद्रव वाढला आहे. या वन्यप्राण्यांनी ...

सिंगारखेडा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदाेस
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : सिंगारखेडा (ता. नरखेड) शिरावात २० दिवसांपासून रानडुक्कर व राेह्यांचा उपद्रव वाढला आहे. या वन्यप्राण्यांनी जंभेरीसह इतर पिकांचे नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जंभेरीचा वापर संत्र्याच्या कलमा तयार करण्यासाठी केला जाताे. देवा चवडे या शेतकऱ्याने त्याच्या दाेन एकरापैकी एका एकरात जंभेरीची लागवड केली असून, त्यासाठी त्याने ४० किलाे बियाणे वापरले व बियाण्यांवर तीन हजार रुपये खर्च केले. संत्र्याच्या कलमांच्या विक्रीतून मिळणाऱ्या मिळकतीवर देवा चवडे याचा वर्षभराचा खर्च चालताे. मागील २० दिवसांपासून या शिवारात राेही व रानडुकरांचा वावर वाढला आहे. या वन्यप्राण्यांनी देवा चवडे याच्या शेतातील जंभेरीची राेपे उद्ध्वस्त केली आहेत.
लकव्यामुळे वडील अंथरूणाला खिळले आहेत, तर बहिणीचे लग्न करावयाचे आहे. दाेन एकर शेताशिवाय उपजीविकेचे काेणतेही साधन नाही. संत्र्याच्या कलमा विक्रीतून बऱ्यापैकी पैसा मिळत असल्याचे देवा चवडे याने सांगितले. दाेन वर्षांपासून या शिवारात राेही व रानडुकरांचा हैदाेस वाढला आहे. त्यांनी जंभेरीचे नुकसान केल्याने आर्थिक संकट काेसळले आहे. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा बंदाेबस्त करावा तसेच आपल्याला याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही देवा चवडे याने केली आहे.